Farah Khan On Her Mother In Law : जेव्हापासून फराह खानने व्लॉग बनवण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्यांचा फॅन फॉलोविंग बराच वाढलेला दिसत आहे. व्लॉगमुळे फराह खान नेहमीच चर्चेत असलेल्या दिसतात. त्या आणि त्यांचा कुक दिलीप नेहमीच व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात. स्वयंपाक करण्याबरोबरच, त्यांचा कुक दिलीपचे वागणे, बोलणे अनेकांच्या पसंतीस पडले आहे. जरी फराह खान आपले वैयक्तिक जीवन अगदी खासगी ठेवत असली तरी ती अधूनमधून नवरा आणि मुलाचे अनेक फोटो शेअर करते. तर एका व्लॉगमध्ये तिने तिच्या सासूची ओळख करुन दिली. फराहने त्याच्या एका व्हिडीओ ब्लॉगमध्ये सासूचा समावेश केला आणि तो व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे.
या व्हिडीओमध्ये फराह खान आणि तिची सासू यांच्यात एक विशेष बॉण्ड असलेला पाहायला मिळाला. फराहने सासू आईसाठी एक विशेष थाई करी बनविली आणि तक्रार करत म्हणाली की, “सासू आई फक्त आपला मुलगा आणि नातवंडांसाठी स्वयंपाक करतात. त्यांच्यासाठी काहीही करत नाही”. फराह खान तिच्या सासूला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होती. त्या घरात येताच तिने सासूचे स्वागत केले आणि तिच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतला. हे पाहून, सासूने तिची सून फराहला टोमणे मारले आणि हसत म्हटलं की, “२० वर्षांत प्रथमच हे घडत आहे”. हे ऐकून, फराह वाईट वाटल्याची ऍक्टिंग करते आणि बोलते, “असे बोलणे महत्वाचे आहे का. हे YouTube चॅनेल आहे. हे सर्व कॅमेर्यासाठी करावे लागते”.
आणखी वाचा – उन्हाळ्यात कितीवेळा तोंड धुणे योग्य, याचे फायदे माहित असतील परंतु नुकसान माहित आहे का?, जाणून घ्या…
त्यानंतर तिने आपल्या आईला स्वयंपाकघरात नेले. तेव्हा तिच्या सासूने पाणी मागितले. यावर फराह म्हणाली, “पाणी? आता वेळ नाही. जेवण बनवायचे आहे. बॅग ठेवा, काम सुरु करा”. चाहत्यांना फराह आणि तिच्या सासूची ही मजामस्ती खूप आवडली आणि व्हीलॉगवर बर्याच कमेंटही केल्या. एकाने लिहिले, ‘सासू-सूनेचे बंधन असे असावे. बनावट प्रेम नाही, तर खरं प्रेम आहे”. तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं, “मला माहित नव्हते की सेलिब्रिटी इतके साधे असू शकतात. हे एक सामान्य कुटुंब आहे”. तर एकाने लिहिले, “व्वा, हे पाहून खूप मज्जा आली”.
आणखी वाचा – “स्कर्ट घालावा लागेल आणि…”, ‘या’ कारणास्तव शाहरुख खानने नाकारलेला करण जोहरचा चित्रपट, स्वतःच केला खुलासा
दुसर्या व्लॉगमध्ये, फराहने करिश्मा तन्नाला सांगितले होते की, तिच्या सासूबाई तिला पाटयावर मसाला कुटायला लावायचे. फराहच्या म्हणण्यानुसार, ती मिक्सरचा वापर करायची हे तिच्या सासूबाईंना आवडायचे नाही. फराहने २००४ मध्ये चित्रपटाचे एडिटर शिरीश कुंदरशी लग्न केले आणि ते तीन मुलांची आई झाली.