‘रहना है तेरे दिल मैं’ या चित्रपटातील ‘मॅडी’ म्हणून लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे आर माधवन. आजवर त्याने अनेकविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. नुकतीच त्याची ‘शैतान’ या चित्रापटातील नकारात्मक भूमिका चांगलीच गाजली होती. आपल्या विविध भूमिकांमुळे चर्चेत राहणारा हा अभिनेता नुकताच त्याच्या नवीन घराच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. माधवनने वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये कोट्यवधींचे अपार्टमेंटही खरेदी केले आहे. जे खूप भव्य आहे. हे अपार्टमेंट अंदाजे ४,१८२ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.
स्क्वेअर यार्डनुसा, आर माधवनने हे अपार्टमेंट तब्बल १७.५ कोटींना विकत घेतले आहे. त्याची ही मालमत्ता Signia Pearl मध्ये आहे, जी एक आलिशान इमारत आहे. या इमारतीत ४ व ५ बीएचके अपार्टमेंट आहेत. या अपार्टमेंटमध्ये ‘व्हेनेशियन स्वीट्स’ आहेत. यात अल्ट्रा लक्झरी खोल्या आहेत. हा प्रकल्प उत्तम जीवनशैलीसाठी अनेक प्रीमियम सुविधा प्रदान करतो. स्क्वेअर यार्डनुसार २२ जुलै रोजी या मालमत्तेवर १.०५ कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले.
आणखी वाचा – इंद्राणीकडूनच नेत्राच्या बाळाला धोका, देवी आईच्या लेकींमध्येच फूट पडणार, रुपालीची नवीन खेळी यशस्वी होणार का?
माधवनचे हे नवीन अपार्टमेंट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे, जे व्यवसाय करण्यासाठी सर्व सुविधांसह येते. उच्च दर्जाच्या सुविधा, लक्झरी राहणीमान आणि परवडणारे स्थान, BKC हे मुंबईतील एक अत्यंत पसंतीचे ठिकाण आहे. त्यामुळे आता हा अभिनेता त्याच्या नवीन घरानिमित्त चांगलाच चर्चेत आहे.
आणखी वाचा – मेष, मिथुन व मीन राशीच्या लोकांसाठी शुक्रवार फलदायी, मनातील इच्छा होतील पूर्ण, जाणून घ्या…
आर माधवन अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही करतो. त्याने ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटामधून दिग्दर्शनात पदार्पण केलं. याशिवाय त्याचे आगामी चित्रपटही लवकर भेटीला येणार असून तो सध्या बऱ्याच प्रोजेक्टवर काम करत आहे. एस. शशिकांतच्या ‘कसोटी’ या पहिल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी तो सज्ज आहे. राजेश टचरिव्हर यांच्या चेम्पकरमन पिल्लई यांच्या बायोपिकमध्ये तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. खेळासंबंधित हा चित्रपट आहे, ज्यामध्ये नयनतारा व सिद्धार्थदेखील दिसणार आहेत.