बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तिच्या सर्व भूमिकांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत. काही महिन्यांपूर्वी ती वाढदिवसाच्या निमित्ताने परदेशात गेली होती. यावेळी तिच्याबरोबर तिचा बॉयफ्रेंड असल्याच्या अनेक चर्चादेखील झाल्या. मात्र या सगळ्यावर अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. आशातच आता तिच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. क्रिती लवकरच तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तिचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यामध्ये क्रिती बॉयफ्रेंड कबीर बहियाबरोबर दिसून येत आहे. दोघंही एका लग्नामध्ये सहभागी झाले होते. (kriti sanon wedding rumour)
क्रिती व कबीर एका लग्नासाठी बॉयफ्रेंडबरोबर सहभागी असलेली दिसून आली. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये क्रिती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये कबीरचे कुटुंबं व मित्रांबरोबर दिसून आली. या पोस्टनंतर दोघांमध्ये असणाऱ्या नात्यांवर चर्चा सुरु झाल्या आहेत. २०२५ साली दोघंही लग्नबंधनात अडकू शकतात अशा शक्यतादेखील व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये क्रिती पाहुण्यांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. एका फोटोमध्ये ती महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीबरोबर बोलताना दिसत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून क्रितीने तिने खासगी आयुष्याबद्दल काहीही भाष्य केले नाही. काही दिवसांपासून कबीर व क्रितीच्या यफेअरच्या अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र या सगळ्यावर क्रिती कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. मात्र गेल्या वर्षी ख्रिसमस व नवीन वर्षांचे स्वागत करताना क्रिती कबीरच्या कुटुंबियांबरोबर दिसून आली होती.
क्रिती व कबीर लंडनमध्ये रोमॅंटिक वेळ घालवताना दिसले होते. तसेच ग्रीसमध्ये क्रिती वाढदिवस साजरा करतानादेखील दिसले होते. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार कबीर हा क्रितीपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. अभिनेत्रीचं वय ३४ वर्ष असून कबीर २५ वर्षांचा आहे. कबीर हा युकेमध्ये त्याचा फॅमिलि बिजनेस सांभाळत आहे. त्याचे एकूण उत्पन्न ४२७ मिलियन असल्याचेदेखील समोर आले आहे.