बॉलिवूडमधील आघाडीची नृत्यदिग्दर्शिका व चित्रपट दिग्दर्शिका फराह खानवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फरहाची आई मेनका यांचा २७ जुलै रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी मृत्यू झाला. या घटणेमुळे फरहा कोलमडली आहे. आईच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेक कलाकार तिचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. त्यांचे अनेक व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच फराहचा जवळचा मित्र व अभिनेता शाहरुख खानही तिच्या घरी पत्नी व मुलीसह पोहोचला. यावेळचा त्याचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सर्वत्रच मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. (farah khan and shahrukh khan video)
फराहचे सांत्वन करण्यासाठी शाहरुख पोहोचला आणि तिला धीर देताना दिसला. यावेळी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख फराहबरोबर काहीटरी बोलताना दिसत आहे. तसेच तिला धीर देतानाही दिसत आहे. सुरक्षारक्षक त्याचा चेहराही छत्रीने झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. शाहरुखव्यतिरिक्त राणी मुखर्जी, शिल्पा शेट्टी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन व भूषण कुमार यांनीही फराहची भेट घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फराहची आई मेनका इराणी यांचे नानावटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचार घेतल्यानंतर त्यांना घरीदेखील आणण्यात आले मात्र पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर लगेचच त्यांना लगेचच पुन्हा एकदा रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्याने त्यांचा मृत्यू झाला. फराहचे वडिल कामरान खान काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. तेदेखील एक मोठे चित्रपटनिर्माते होते.
वडिलांच्या मृत्यूनंतर फराहच्या आईनेच मुलांचा सांभाळ केला होता. १२ जुलै रोजी तिच्या आईचा वाढदिवसही साजरा केला होता. यादरम्यान फराहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये “आम्ही सर्वजण आमच्या आईला गृहीत धरतो. विशेषत: गेल्या महिन्यात मी माझी आई मेनकावर किती प्रेम करतो याचा खुलासा झाला आहे. ती आजवर पाहिलेली सर्वात मजबूत, धाडसी व्यक्ती आहे. अनेक शस्त्रक्रियांनंतरही तिची विनोद बुद्धी खूप तल्लख आहे”, असे तिने लिहिले होते. “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. घरी परतण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करण्यासाठी तू पुरेशी मजबूत होण्याची वाट पाहू शकत नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे”, असे लिहिले होते.