बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या अधिक चर्चेत असलेली बघायला मिळते. सोनाक्षी व झहीर यांनी या वर्षी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली होती. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर सोनाक्षी व झहीर हे अनेक देशांमध्ये फिरतानादेखील दिसले. त्यांचे फिरतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळाले होते. मात्र दरम्याने अनेकदा सोनाक्षी गरोदर असण्याच्या चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाल्या. मात्र सोनाक्षीने या सगळ्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. सोशल मीडियावर याबद्दलच्या अनेक पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. अशातच आता सोनाक्षीने गरोदरपणाच्या अफवांवर मौन सोडले आहे. (sonakshi sinha on pregnancy)
सोनाक्षीने नुकतीच ‘कर्ली टेल्स’ला मुलाखत दिली, यावेळी सोनाक्षीने गरोदरपणाच्या चर्चांवर भाष्य केले. ती म्हणाली, “मला हे सांगायचं आहे की मी गरोदर नाही. मी फक्त जाड झाले आहे”. दरम्यान एका नेटकऱ्याने सोनाक्षीला गरोदर असल्या कारणाने शुभेच्छादेखील दिल्या होत्या. सोनाक्षी पुढे म्हणाली की, “लग्नानंतर फिरण्यात आणि लंच-डिनरमध्येच आम्ही व्यस्त आहोत. त्यामुळे इतर कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाही”.
आणखी वाचा – अधिपतीच्या गैरसमजामुळे अक्षरा घर सोडणार?, भुवनेश्वरीची चाल यशस्वी, मालिकेत मोठा ट्विस्ट
लग्नानंतर सोनाक्षी चार वेळा हनीमूनला जाऊन आली आहे. झहीरबरोबर ती तिच्या आयुष्यातील सुंदर क्षण जगत आहे. दोघंही एकमेकांबरोबर खूप खुश असल्याचेचेही दिसून येते. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील बघायला मिळतात. तसेच दोघंही एकमेकांबरोबर प्रॅंकदेखील करताना दिसतात. नुकताच झहीरचा वाढदिवस सोनाक्षी व तिच्या कुटुंबाबरोबर पार पडला. या सेलिब्रेशनमध्ये शत्रुघ्न सिन्हा, पुनम सिन्हा व रेखा हे सहभागी झाले होते. यावेळी सगळेच एकदम खुश असलेले दिसून आले.
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरने दोघांनी एकमेकांना ७ वर्षे डेट केल्यानंतर यावर्षी २३ जून रोजी मुंबईत लग्न केले. झहीर आणि सोनाक्षीने एकत्र काम केले आहे. दोघे ‘डबल एक्सएल’मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटात हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात . सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात आणि चाहतेही या दोघांच्या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद देतात.