‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली असून ही सुरुवातचं भांडणांनी झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून् निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच कालच्या भागात निक्कीने वर्षा ताईं बरोबर भांडण करताना आपली पातळी सोडली. घरातील सर्व सदस्य लिव्हिंग परिसरात बसले असताना ‘बिग बॉस’ जे जे घरातील बेडवर बसले होते त्यांच्यामुळे इतर सदस्यांना शिक्षा सूनावतात. बेडवर बसलेले सदस्य हे अरबाज, अभिजीत व वर्षा उसगांवकर असतात. त्यांनी नियम भंग केल्यामुळे ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांना शिक्षा सुनावतात.
“घरातील बेड हे बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी नाहीत असं सांगूनही नियमांचे उल्लंघन झाले” असं म्हणत ‘बिग बॉस’ सर्वांना संपुर्ण आठवडा बेडशिवाय झोपण्याची शिक्षा देतात. तेव्हा वर्षा उसगांवकर “चुकून झालं” असं म्हणत माफी मागतात. मात्र त्याचवेळी निक्की त्यांना टार्गेट करत तुमच्यामुळे सर्वांना भोगावे लागत असल्याचे म्हणते. यावरून त्यांच्यात खडाजंगी होते. ‘बिग बॉस’ने केलेल्या शिक्षेमुळे निक्कीचा पारा चढतो आणि ती वर्षा उसगांवकर यांच्याशी वाद घालायला सुरुवात करते. हा वाद इतक्या टोकाला जातो की निक्की नकळत त्यांची अक्कल काढते व त्यांच्या चारित्र्यावरही टिप्पणी करते.
निक्की वर्षा यांना “तुमच्यामुळे आम्हाला त्रास भोगावा लागत आहे” असं म्हणत असताना वर्षाताई यासुद्धा हे फक्त माझ्यामुळे झाले नसल्याचे तिला सांगत असतात. पण ती त्यांचे काहीच ऐकू न घेता खूप काही बोलून जाते. याचवेळी ती सर्वांनी वर्षाताईंना बोलावे असं म्हणते. “तुमच्या एका चुकीमुळे आम्हाला भोगावे लागत आहे” असं म्हणताना निक्कीचा आवाज चढतो. तेव्हा वर्षाताई तिला “शांत बस” असं म्हणतात. तेव्हा निक्की “माझी बोलण्याची हीच पद्धत आहे” असं उत्तर देते. पुढे वर्षाताई “मी माझी चूक मान्य करते” असं म्हणतात. तेव्हा निक्की त्यांना “तुम्ही बेडवर जेव्हा पाय वर करुन झोपल्या होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती” असं म्हणते. तेव्हा वर्षाताई तिला “अक्कल काढू नको असं म्हणतात. मात्र निक्की त्यांना न जुमानता “मी तुमची अक्कल काढणार” असं उलट उत्तर देते.
पुढे निक्की त्यांच्यावर बोट उगारत त्यांना बोलत असते. तेव्हाही वर्षाताई “तू असं बोट वर करुन बोलू नकोस” असं म्हणतात. मात्र निक्की तेव्हाही त्यांना “माझा हात, माझं बोट, माझं तोंड आहे मी काहीही करेन” असं म्हणते. याचवेळी वर्षाताई “निक्की हा तुझा माज आहे” असं म्हणतात. हे बोलत असताना त्याही निक्कीवर बोट दाखवतात. तेव्हा निक्की त्यांना तुम्ही माझ्यावर बोट उचलुन बोलत आहात यावरुन तुमचं character दिसून येतं असं म्हणते. यावर वर्षाताईही “character वेगळं असतं. character म्हणजे चरित्र” असं म्हणतात. यानंतर निक्कीही वर्षातईंना “तंगड्या वर करुन झोपणे हा तुमचा माज आहे” असं म्हणते.
आणखी वाचा – मेष व मीन राशींच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस फायद्याचा, नोकरी-व्यवसायात मिळणार अपेक्षित यश, जाणून घ्या…
यापुढे निक्की “तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर बिलकुल करु नका. तुम्ही मोठ्या अभिनेत्री, मोठ्या कलाकार वगैरे असाल तर बाहेर इथे नाही. इथे सगळे समान आहेत” असं म्हणत असताना त्यांचा एकेरी उल्लेखदेखील करते. दरम्यान, घरातील सदस्य त्यांच्यातील भांडण सोडवतात. मात्र या सगळ्यामुळे वर्षाताईंना त्रास झाला असून त्या खूपच भावुक होतात