‘बिग बॉस ओटीटी’चं सध्या तिसरं पर्व खूप गाजत आहे. या पर्वातील अनेक सभासद मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींबरोबर सहभागी झाला होता. मात्र मध्येच त्याची पहिली पत्नी पायल मलिकला घराबाहेर पडावे लागले होते. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये कृतिका व अरमान यांचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसून आले. आता या शोचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. रणवीर शोरी, लवकेश कटारिया, अरमान मलिक, साई केतन राव, नैजि व सना मकबुल हे सदस्य या घरामध्ये असलेले दिसून येत आहेत. (kritika malik on suicide)
नुकत्याच झालेल्या भागामध्ये माध्यमांनी हजेरी लावली होती. त्यांनी सर्व सदस्यांना प्रश्नदेखील विचारले. याचवेळी अरमान व कृतिकाच्या नात्यावर अनेक प्रश्न उभे राहिले. खासकरुन कृतिकावर अरमान व पायल यांच्यामध्ये आल्याचे आरोप करण्यात आले. ‘बिग बॉस…’ मध्ये या जोडीला मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागला. एका पत्रकाराने कृतिकाला ‘डायन’ व ‘धोका देणारी मैत्रीण’ असेही म्हंटले आहे.
आणखी वाचा – पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस’च्या घरातील पाणी गायब, सदस्यांची तारांबळ, आणखी नवा ट्विस्ट आणणार
पत्रकार परिषदेदरम्यान अरमानला कृतिकावर हावी होण्याबद्दल विचारले असता त्याने या सगळ्याला नकार दिला. याचवेळी तिला विचारले की, “सर्वात जवळच्या मैत्रिणीला धोका देताना लाज नाही वाटली का?”, त्यावर तिने उत्तर दिले की, “मला सुरुवातीला खूप लाज वाटली, अनेक समस्यांचा सामनादेखील करावा लागला, आम्ही तिघंही वेगळे झालो आणि मी आत्महत्या करण्याचा विचार केला. पण मला नंतर वाटलं की मी अरमानबरोबर नाही राहू शकत. पण पायलमुळे हे नातं पुढे टिकलं”.
त्यानंतर कृतिकाला विचारले की, “अरमान तुझ्यापेक्षा पायलला अधिक पसंत करतो का?”, त्यावर कृतिका म्हणाली, “मी व पायल आम्ही दोघीही अरमानसाठी सारख्याच आहोत. पण एवढेच झाले की पायल लवकर घरातून बाहेर पडली आणि मी अरमानबरोबर राहिले. त्यामुळे एक पती म्हणून तो माझ्या जवळ होता”. त्यानंतर पायल घटस्फोट घेणार असल्याचे अरमानला सांगितले. यावर तो म्हणाला की, “ती पायलची चॉइस आहे. जर तिला राहायचे असेल किंवा सोडायचे असेल तर तिच्या निर्णयाचे मी स्वागत करेन. पण जेव्हा मी बाहेर जाईन तेव्हा यावर आम्ही विचार करु. आम्ही तिघही एकत्र राहू. देव जरी आला तरीही तो आम्हाला वेगळे नाही करु शकत”.
दरम्यान 2 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. सुरुवातीला 16 सदस्य यामध्ये होते मात्र आता केवळ 7 सदस्य बाकी आहेत. या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.