अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरून ती नेहमीच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट देत असते. अलीकडे ती आदिल खान दुर्रानी सोबतच्या घटस्फोट प्रकरणामुळे चर्चेत होती. अत्याचार आणि घरगुती हिंसाचार या राखी सावंतच्या आरोपामुळे सध्या आदिल खान दुराणी तुरुंगवासात आहे. सुरुवातीला राखीला आदिलसोबत घटस्फोट घ्यायचा नव्हता, मात्र आता राखीला घटस्फोटाचे वेध लागले आहेत.(Rakhi Sawant Divorce News)
राखीने तिला लवकर घटस्फोट मिळावा यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वकिलासोबत बोलताना दिसतेय, वकिलाला ती लवकर घटस्फोट मिळवून दे असे म्हणताना दिसत आहे. पुढे ती, मी ठीक आहे माझ्या घटस्फोटाच्या कागदपत्रांचे काय झाले? ते आधी मला सांगा, मला माझ्या आयुष्यात माझा आनंद हवा आहे. माझ्या आयुष्यातून या त्रासाला बाहेर काढा आणि मला लवकर घटस्फोट मिळवून द्या.
पाहा घटस्फोटाला घेऊन काय म्हणाली राखी (Rakhi Sawant Divorce News)
यापुढे राखी म्हणते, ‘त्याचे वडीलही मान्य करतील. त्यांनी मला असंही सून म्हणून स्वीकारलं नाहीच आहे. त्याने माझ्याशी खूप गैरवर्तन केले आहे. होय, कोर्टाचे काम लवकर करा, ६ महिने लागतील? जजसमोर डान्स करूया का, म्हणजे ते लवकर घटस्फोट करून देतील असंही तिने वकिलाला विचारला. शिवाय अरे, माझ्या आयुष्यात सुख यावं असं तुला वाटत नाही.’ असा प्रश्न वकिलाला केला. या व्हिडीओवरून राखीला घटस्फोटाचे वेध लागल्याचं कळतंय.(Rakhi Sawant Divorce News)
हे देखील वाचा – ‘म्हणून’ तुटलं अभिनेता सुशांत सिंग आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचं नातं
बरं हे वेध दुसरे तिसरे काही नसून राखी पुन्हा प्रेमात पडली आहे का म्हणून असावेत का अशी शंका वाटतेय. कारण राखीला पॅप्सने विचारले की तुम्ही खूप हसत आहात, दुबईत तुम्हाला कोणी सापडले आहे का? या प्रश्नावर ती आणखी हसायला लागली. आणि म्हणाली आधी माझा आदिलसोबत घटस्फोट होऊन दे मग सांगेन. यावरून राखी पुन्हा प्रेमात पडली असल्याचे संकेत मिळत आहेत.
