शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बायकोच्या आठवणीत अविनाश नारकरांचा चालत्या गाडीतच डान्स, व्हिडीओही केला शेअर, बायकोने दिले थेट उत्तर

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 12, 2024 | 11:06 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Avinash Narkar danced in the car in memory of of his wife video viral on social media

Video : बायकोच्या आठवणीत अविनाश नारकरांचा चालत्या गाडीतच डान्स, व्हिडीओही केला शेअर, बायकोने दिले थेट उत्तर

मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे कायमच चर्चेत असणारे कपल आहे. या कपलने ९०च्या दशकातील चित्रपट गाजवले होते. आजही एक आदर्श म्हणून ओळखले जातात. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे एकत्र डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ऐश्वर्या व अविनाश यांना डान्सची आवड आहे. त्यामुळे हे दोघेही त्यांची डान्सची आवड पूर्ण करताना दिसून येते.

ऐश्वर्या नारकर यांच्यापेक्षा अविनाश नारकरांना डान्सची आवड अधिक असून ऐश्वर्या यांच्यापेक्षा अविनाश नारकरच चांगला डान्स करतात असं मत ऐश्वर्या यांनी अनेकदा व्यक्त केलं आहे. त्यामुळे ट्रोलर्सला न जुमानता अविनाश नारकर त्यांची डान्सची हौस व आवड अगदी मनापासून पूर्ण करतात. अविनाश नारकर हे सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात. ते त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात आणि त्यांच्या या व्हिडीओलं प्रेक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच त्यांनी नुकतीच केलेली नवीन रील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Avinash Narkar (@avinash.narkar)

आणखी वाचा – मेष, तूळ राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस महत्त्वाचा, करिअरमध्ये मिळणार यश आणि व्यवसायात लाभ

प्रवासादरम्यान गाडीतच अविनाश नारकरांनी एक डान्स व्हिडीओ केला असून याचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे. तसेच त्यांनी या व्हिडीओखाली एक पोस्टही लिहिली आहे. “व्वा व्वा व्वा व्वा… नगरहून परतीचा प्रवास…अचानक धो धो कोसळणारा पाऊस आणि बायकोची मुसळधार आठवण… दिलाची आणि मनाची अवस्था आणखी काय होणार”. या हटके डान्सवर अविनाश यांनी अगदीच धमाकेदार डान्स केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

आणखी वाचा – अस्तिकट्यार नष्ट करण्याचा रुपालीचा प्रयत्न, विरोचकाच्या खेळीत राजाध्यक्ष कुटुंब फसणार, मात्र नेत्रा खेळणार नवा डाव

दरम्यान, या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे या व्हिडीओखाली अनेकांना त्यांचा डान्स आवडत असल्याचेही म्हटले आहे. तर ऐश्वर्या नारकरांनीदेखील नवऱ्याच्या या डान्स व्हिडीओवर कमेंट करत प्रतिसाद दिला आहे. हसण्याच्या ईमोजीद्वारे त्यांनी कमेंट केली आहे.    

Tags: avinash narkarAvinash Narkar Dance Video Newsmarathi entertainemnt news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Yeh Rishta Kya Kehlata Hai Sanjay Gandhi

‘ये रिश्ता क्या…’ फेम अभिनेत्याचं पैसे नसल्यामुळे जगणंही झालं कठीण, घरभाडे भरण्यासही पैसे नाहीत, म्हणाले, “माझ्या मित्रांकडून…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.