Archana Puran Singh Mother : वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही अनेक पालक आजही फिट आहेत. त्यांच्याकडे पाहून त्यांनी नव्वदी ओलांडली आहे असं अजिबातच वाटत नाही. अनेकदा मुलं त्यांच्या वयोवृद्ध पालकांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशातच अभिनेत्री अर्चना पुरण सिंग हिने तिच्या ९४ वर्षीय आईचा शेअर केलेला एक व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अर्चना पुरण सिंग तिच्या युट्युब चॅनेलवर तिच्या दोन मुलांसह आयुष्मान आणि आर्यमान यांच्यासह परमीत सेठीबरोबरचेही अनेक व्हिडीओ शेअर करत असते. परंतु आता त्याने आपल्या आईचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो प्रत्येकाला शेअर करण्याची इच्छा होईल.
वयाच्या ९४ व्या वर्षी ती उत्तम प्रकारे तंदुरुस्त आहे आणि तंदुरुस्तीमध्ये ती साऱ्यांना फाईटही देत आहे. जिममध्ये अर्चना पुरण सिंगची आई बॉक्सिंग करताना दिसत आहे आणि मुलाच्या आदेशानुसार ती बॉक्सिंग शिकताना दिसत आहे. हा व्हिडीओ अर्चना पुरण सिंगच्या इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. यामध्ये, अभिनेत्रीच्या आईने तिच्या हातात बॉक्सिंग ग्लोव्हज घातले आहेत. आणि अर्चनाचा लेक म्हणत आहे की, “मित्रांनो, आज आम्ही नानीला जिममध्ये आणले आहे. त्यांनी काय परिधान केले आहे ते पहा”. या नंतर प्रत्येकजण हसताना दिसत आहे. त्यानंतर अर्चना तिच्या आईला बॉक्सिंग कशी केली जाते हे दाखवत आहे.
अर्चना पुरण सिंगच्या आईचा व्हिडीओ
परमीत सेठीची सासू बॉक्सिंग बॅगला मारताना दिसत आहे आणि हे पाहून प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहे. या व्हिडीओमध्ये नातू, लेक, जावई सगळेच काळजी घेताना दिसत आहेत. त्यांचे हे संपूर्ण कुटुंब परिपूर्ण असल्याचे आणि आनंदात असल्याचं दिसत आहे. अर्चना व्हिडीओमध्ये म्हणतेय की, “माझी आई सर्वात मजबूत आहे”. ती आईला विचारते, “मम्मी, तू तारुण्यात कधी जिममध्ये गेली आहेस का?”. यावर ती उत्तर देते, “जिम म्हणजे काय होते हेही मला माहित नव्हते”, तर हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने लिहिले आहे की, “माझी आई मेरी कोम बनली आहे”.
आणखी वाचा – १८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण
अर्चना पुरण सिंगच्या आईचं कौतुक
अर्चना पुरण सिंगच्या आईच्या व्हिडीओवर लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रेड हार्ट इमोजीद्वारे बर्याच वापरकर्त्यांनी तिच्या आईचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले आहे की, “सुपर मॉम”. एकाने लिहिले आहे की, “असे दिसते आहे की आपल्या आईने आपल्याला प्रत्येक कौशल्यात ट्रेन केले आहे”. एकाने लिहिले आहे की, “सुपर नानी जी”. तर एकाने लिहिले, “नानी जीने चमत्कार केला”. तर एकाने लिहिले, “नानीशी स्पर्धा करू नका, ती सर्वांना मारेल”.