आज हनुमान जयंती दहीहंडीला जसा गोविंदाचा सूर ऐकू येतो तसाच हनुमान जयंती दिवशी दिवसाची सुरुवात अंजनीच्या सुता हे गाणं ऐकल्या शिवाय वातावरण भक्तिमय होत नाही एवढं नक्की. हनुमान जन्मोत्सव, मारुतीरायाचा पाळणा भक्तिमय वातावरण आणि दादांनी लिहिलेलं अप्रतिम गाणं. एकाच साचात कलाकाराला तोलणं हे कधी कधी कलाकाराच्या विविधतेला बंदिस्त करणारं ठरू शकत पण दादा कोंडके हे नाव त्याला अपवाद होत. चित्रपटांच्या नावा सोबत त्यातील गाणी ही तशीच असायची नावामध्ये गंमत आणि नंतर दादांच्या नृत्यकलेतही गंमतच. बहुतांश चित्रपटांची गाणी दादांनी स्वतःच लिहिली.(Anjanichya Suta Dada Kondke)
दादा म्हणल कि गंमत आणि वेगळ्या अर्थाची गाणी असा समज झालेल्या समाजाला दादांनी लिहिलेलय गेला सोडूनि कान्हा मजला, अंजनीच्या सुता या गाणी देखील चांगलीच भुरळ पाडलेली दिसते. दादा कोंडकेंनी दिगदर्शित केलेला असाच एक चित्रपट म्हणजे तुमचं आमचं जमल. चित्रपटाची कथा राधा कृष्णा या दोन पात्रांभोवती फिरते तर नाग्या हे अशोक सराफ यांनी साकारलेलं नकारात्मक पात्र देखील चांगलंच साधलं गेलेलं दिसतंय. दादांचं लिखाण आणि चित्रपट हिट होणार नाही असच कमी वेळा घडलं असेल.

महेंद्र कपूर यांनी भक्तिमय सुरात गायलं गाणं
हा चित्रपट उत्कृष्ट कथे साठी नावाजला गेलाच पण एक गोष्ट या चित्रपटाची एवढी प्रसिद्ध ठरली कि आजही ती गोष्ट प्रेक्षक रोजच्या जीवनात रोज अनुभवत असतात. ती गोष्ट म्हणजे दस्तुरखुद्द दादा कोंडके यांनी लिहिलेल ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’ हे गाणं. आज हनुमंतरायांचा जन्मदिवस जगभरात आज जिथे जिथे जयंती साजरी होणार तिथे दादांचं हे गाणं वाजणार एवढं नक्की.(Anjanichya Suta Dada Kondke)
हे देखील वाचा – ‘माने ना रे तू…’ सावत्याला भेटून अशोक मामांची रिऍक्शन रोहित मानेची पोस्ट व्हायरल
तुमचं आमचं जमल या चित्रपटात या गाण्याचे बोल दादा कोंडके यांनी स्वतः लिहिले होते तर हे गाणं गायलं होत मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध गायकांच्या यादीत ज्यांचं नाव घेतलं जात अशा महेंद्र कपूर यांनी. त्या काळी दादांनी जेवढ्या आत्मयितेने ते गाणं लिहिलं तितक्याच भक्तिभावाच्या भावनेनं महेंद्र कपूर यांनी ती गायलं असाव असं ते ऐकताना वाटत. आज ही अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे शब्द ऐकले कि आपसूकच एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हे आपल्या सगळ्यांच्या मुखातून आल्याशिवाय राहत नाही.