Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अखेर अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या शाही विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. सर्वत्र या लग्नाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच या लग्नातील नववधूच्या खास लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनंत अंबानीची पत्नी राधिका मर्चंटचा लग्नातील लूक समोर आला आहे. आणि या लूकची सर्वत्र चर्चाही रंगलेली पाहायला मिळत आहे. अंबानी कुटुंबातील भावी सूनेने तिच्या खास दिवसासाठी गुजराती नवऱ्या मुलीच्या लूकची निवड केली. राधिका मर्चंटने तिच्या लग्नात डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता.
राधिका मर्चंटने अबू संदीपच्या ‘पाणेतर’ लेहेंगा कलेक्शनमधील लेहेंगा परिधान केला होता. अंबानी कुटुंबाची धाकटी सून गुजराती परंपरेनुसार नववधू बनली, पांढऱ्या लेहेंग्यासह लाल दुपट्टा तिने यावेकी परिधान केला, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. राधिका मर्चंटच्या या हस्तिदंती जरदोजी कट-वर्कच्या पोशाखात एक लांब पायवाटा आणि पाच मीटरचा बुरखा आणि टिश्यू शोल्डर दुपट्टा जोडला होता. लेहेंग्यावर लाल रंगाची नक्षी दिसत होती, ज्यावर नक्षी, सादी व जरदोजी वर्क होते.
आणखी वाचा – अखेर अनंत अंबानी व राधिका मर्चंट अडकले लग्नबंधनात, नवविवाहित जोडप्याचा पहिला फोटो समोर
स्टोन, सिक्वीन्स, कॉपर टिक्की तसेच रेड सिल्कने बनवलेला हा लेहेंगा खूपच सुंदर दिसत होता. राधिकाच्या डोक्यावरील बुरखा नेटचा असून त्यावर कट वर्क आहे. हा आउटफिट लाल रंगाच्या शोल्डर दुपट्ट्यासह पूर्ण करण्यात आला. यावेळी राधिकाने जड दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला. तिने चोकरसह मल्टी-लेयर नेकलेस घातला आहे. कानात झुमके, कपाळावर मांग टिक्का आणि काळी बिंदी अशा खास लूकमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत आहे. लाल बांगड्या आणि आर्मलेटने नवरी मुलगी म्हणून तिचा लूक पूर्ण केला.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे १२ जुलै रोजी लग्न झाले. या जोडप्याने जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वैदिक हिंदू विधीनुसार सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाला देश-विदेशातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.