अंबानी कुटुंबात सध्या लगीनघाई सुरु आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट आज १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. हे विवाहित जोडपे गेल्या काही काळापासून त्यांच्या प्री-वेडिंगमुळे चर्चेत होते. अनंत व राधिका यांनी नुकतीच आपापल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत गृहशांती पूजा केली. त्याच्या लग्नापुर्वीच्या कार्यक्रमातील अनेक फोटो व व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. एका व्हिडीओमध्ये अंबानी परिवार गृहशांती पूजेच्या ठिकाणी पोहोचताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये अनंत अंबानींना पाहून राधिका मर्चंट क्युट एक्सप्रेशन देताना दिसत आहेत. (Anant Ambani-Radhika Merchant Wedding)
यावेळी राधिका क्रीम व सोनेरी रंगाच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. अशा अनेक गोष्टी या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाल्या ज्या लक्ष वेधून घेत आहेत. लाल व सोनेरी कपड्यांमध्ये अनंत अंबानीही खूप हँडसम दिसत होता. राधिका मर्चंटची आई शैला मर्चंट यांनी पूजेची थाळी हातात घेऊन वराचे स्वागत केले. तर राधिकाचा साडीमधील खास लूकही लक्षवेधी ठरला. यावेळी राधिकाने परिधान केलेले दागिने अधिक लक्ष वेधून घेत होते. तिचा मांग टिक्का, कुमकुम आणि गजऱ्याने तिच्या लूकमध्ये वाढ केली.
व्हिडीओमध्ये राधिका मर्चंट अनंत अंबानींच्या गळ्यात फुलांचा हार घालताना दिसत आहे. राधिकाने तिचे वडील वीरेन मर्चंट यांनाही मिठी मारली आणि त्या क्षणी लेकीच्या लग्नात ते भावूकही झालेले दिसले. यानंतर वर-वधू त्यांना मिठी मारत धीर देताना दिसले. एकमेकांना मिठी मारताना हे कपल खूपच क्यूट दिसत आहे. राधिकाने अनंतचे वडील मुकेश अंबानी यांनाही मिठी मारली.
आणखी वाचा – बायको व लेक घरीच, आई व बहिणीसह काशी विश्वनाथला पोहोचला अभिषेक बच्चन, वाद की आणखी काही?
राधिका तिच्या होणाऱ्या सासू नीता अंबानी यांच्याबरोबर एका लग्नविधीत सहभागी होताना दिसली. त्यानंतर राधिकाने नतमस्तक होत त्यांचे आशीर्वादही घेतले. अंबानी कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नाच्या तीन दिवस आधी ९ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये गृहशांती पूजेचे आयोजन केले होते. त्यांच्या लग्नानंतर त्यांचा आशीर्वाद सोहळा आणि त्यानंतर ‘मंगल उत्सव’ म्हणजेच रिसेप्शन होईल.