मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. १२ जुलै रोजी मुंबई येथील जिओ कन्वेन्शन सेंटर येथे थाटामाटात पार पडला. टयांच्या विवाहसोहळ्याला जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या शाही विवाहसोहळ्याआधी अंबानी कुटुंबीयांनी दोन वेळा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले होते. फेब्रुवारी महिन्यात गुजरात येथील जामनगरमध्ये पहिल्यांदा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यासाठी जगभरातून अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यानंतर मे महिन्यात दुसऱ्यांदा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले होते. हा सोहळा अलिशान क्रूझवर आयोजित करण्यात आला होता. (anant ambani and radhika merchant honeymoon)
अनंत व राधिकाच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडिओ समोर आले आहेत. यावेळच्या दोघांच्याही पहरावाची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाली. लग्न झाल्यानंतर आता नवीन जोडप्याच्या हनिमूनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनंत व राधिका हनीमूनसाठी कुठे जाऊ शकतात हे आपण जाणून घेऊया. फिजी आयर्लंड : अनंत व राधिका हे त्यांच्या रोमॅंटिक हनिमूनसाठी फिजी आयर्लंडला जाऊ शकतात. हनिमूनसाठी दोघं या ठिकाणी जाऊ शकतात.
साऊथ आफ्रिका : अनंत व राधिकाच्या लग्नानंतर साऊथ आफ्रिकेचा पर्यायदेखील निवडू शकतात. साऊथ आफ्रिकेच्या डोंगरदऱ्यांमध्ये नवीन जोडपं आपला रोमॅंटिक वेळ घालवू शकतात.
स्वित्झर्लंड : हनिमूनला जाणाऱ्यांसाठी स्वित्झर्लंड हा पर्याय उत्तम असतो. या ठिकाणी जिनेवा झील व ल्युसर्न झील सारखी सुंदर ठिकाणं पाहायला मिळत आहेत. तसेच सुंदर नद्या, डोंगर असे अविश्वसनीय निसर्गाचे सौंदर्य असल्याने या ठिकाणी नवीन जोडपं हनीमूनला जाऊ शकतात.
बोरा-बोरा आयर्लंड : बोरा-बोरा आयर्लंड हे चांगले ठिकाण ठरू शकते. फिरोजा लगून, ओव्हर वॉटर बंगलो व ट्रॉपिकल ब्युटीसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे आयर्लंड खूप सुंदर आहे. या ठिकाणी रोमॅंटिक वेळ घालवण्यासाठी अनंत व राधिका या ठिकाणी येऊ शकतात.
त्यामुळे आता अनंत व राधिका नक्की कुठे हनिमूनला जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे.