महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांची ख्याती जगभरात आहे. अभिनय, मेहनत, वक्तशीरपणा, चिकाटी या गुणांमुळे त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीत अव्वल दर्जाचं स्थान आहे. सेटवरील दिलेली वेळ इतका मोठा कर्तबगार, यशस्वी अभिनेता झाल्यानंतरही ते अचूक पाळतात. आणि मुख्यत्वे पंच्यात्तरी नंतरही ते सेटवर मेकअपसहित हजर असतात. (amitabh bacchan boycott)
वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरी त्यांच्या कामाची ऊर्जा तरुणाईला लाजवेल अशी आहे. काही दिवसांपूर्वीच प्रोजेक्ट के चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर त्यांचा अपघात झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. या सगळ्या बातम्या वाचत असताना अचानक मला ‘सेलिब्रिटींच्या भेटीगाठी’ या अनिता पाध्ये यांच्या पुस्तकाची आठवण झाली.
वाचा का अमिताभ यांच्यावर बहिष्कार घातला होता पत्रकारांनी – (amitabh bacchan boycott)
‘सेलिब्रिटींच्या भेटीगाठी’ पुस्तकात ‘बाप आणि मुलं’ या भागात अनिता पाध्येंनी एक किस्सा शेअर केलेला आठवला. अमिताभ बच्चन यांच्यावर तब्ब्ल १५ वर्ष प्रेसने बहिष्कार घातला होता. ‘स्टारडम’ मासिकाने आर्मी जवानांच्या पत्नींच्या मदतीसाठी एक चॅरिटी कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र यलो जर्नलिझम करणाऱ्या या मासिकाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा अशी इच्छा दिलीप कुमार यांची होती. त्या संबंधित आयोजित मीटिंगमध्ये सायरा बानूद्वारा फोन करून दिलीप कुमार यांनी अमिताभ यांना बोलावलं होत. परंतु त्या बहिष्कारासंबंधी अमिताभ यांची नकारात्मक मुलाखत स्टारडममध्ये प्रसिद्ध झाली होती. परिणामी दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन या दोन्ही कलाकारांवर बहिष्कार घालण्यात आला. परंतु अमिताभ बच्चन यांच्यावरील बहिष्काराच प्रकरण चिघळलं ते आणीबाणीमुळे. (amitabh bacchan boycott)

आणीबाणी लागू झाल्यानंतर चित्रपटसृष्टीतील काही मंडळींवर व सिनेमासिकांवर बहिष्कार घालण्यात आला. तर काही सिनेमासिकांवर त्यातील बातम्यांवर सेन्सॉरशिप लादली गेली. दरम्यान सिनेमासिकांच्या व्यवसायावर या सेन्सॉरशिपचा फारच विपरीत परिणाम झाला. गांधी परिवारासोबत अमिताभ यांचे जवळचे संबंध असल्याने या बॅन व सेन्सॉरशिप मागे त्यांचाच हात आहे अशी बातमी पसरली.
त्यामुळे १९७७ मध्ये श्रीमती गांधी निवडणूक हारल्यानंतर व आणीबाणी संपल्यानंतर काही प्रमुख सिने नियतकालिकांनी एकत्र येऊन अमर्यादित काळासाठी बहिष्कार घातला. त्यांनतर कधी चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी अमिताभ असले तर फोटोग्राफर्स अमिताभ यांना बाजूला होण्यास सांगत, अनेकदा अमिताभ स्वतः बाजूला जाऊन उभे राहत. (amitabh bacchan boycott)
====
हे देखील वाचा – तेजश्री प्रधानचा चाहत्यांना ‘हा’ सल्ला
====
राजकारणात जेव्हा अमिताभ यांनी प्रवेश केला तेव्हा ते बोफोर्स घोटाळ्यात गोवले गेले. त्याचा परिणाम त्याच्या कारकिर्दीवर व लोकप्रियतेवर झाला. दरम्यान ‘अजूबा’ चित्रपटाच्या सेटवर प्रसिद्धी प्रमुख यांनी काही पत्रकारांना बोलावून घेतले होते तेव्हा थेट अमिताभ यांनी बोफोर्स प्रकरणातील आरोप खोटे असल्याचे त्यांनी सांगत आणिबाणीमध्ये प्रेसवाल्यांचा त्यांच्याबद्दल गैरसमज झाला होता याविषयी खुलासा केला. तेव्हा प्रेसवाल्यांचा त्यांच्यावरील रागही निवळला होता. त्यामुळे तब्बल १५ वर्षांनी प्रेस व अमिताभ यांची एकमेकांशी घेतलेली कट्टी सुटली होती.