Sydney Sweeney To Launch Soap : अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनीने असे काहीतरी केले आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि सर्व क्षेत्रातून तिच्यावर टीका केली जात आहे. खरंतर, सिडनीने एक नैसर्गिक साबण बनविण्यास सुरुवात केली आहे, जो तिच्या आंघोळीच्या पाण्यापासून बनविला गेला आहे. आता या साबणाची विक्री ही मर्यादित काळासाठी बाजारात सुरु केली जाईल. आणि ही खरेदी आपण केवळ १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटात असाल तेव्हाच करू शकता. ऐकावं ते नवलंच. स्वतःच्याच अंघोळीच्या पाण्याचा साठा करुन अभिनेत्रीने साबण बनविण्यास सुरुवात केली हे हास्यास्पद आहे. पण हो, तिने याची विक्री सुरु केली असून याकडे ती एका व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत आहे.
‘युफोरिया’ या हिट वेबसीरिजमधून चर्चेत आलेल्या सिडनी स्वीनीला विशेष लोकप्रियता मिळाली. यासाठी स्वीनीने स्क्वॉच नावाच्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ही कंपनी नैसर्गिक आणि घरगुती साबणासाठी प्रसिद्ध आहे. हे साबण बनवण्यासाठी सिडनी स्वीनीने तिच्या आंघोळीचे पाणी देखील जोडले गेले आहे. साबणाचे नाव ‘सिडनीज बाथवॉटर ब्लिस’ असे ठेवण्यात आले आहे.
सिडनी स्वीनीच्या साबणाची किंमत नेमकी किती
या साबणाची किंमत ६८४ रुपये ठेवली गेली आहे. या साबणाची विक्री सहा जून रोजी बाजारात अधिकृतपणे सुरु केली जाईल. सिडनी स्वीनी यांनी इन्स्टाग्रामवर या साबणाबाबत जाहीर केले, ज्याने लिहिले की, “तुम्ही लोक डॉ. स्क्वॉचच्या जाहिरातीनंतर माझ्या बाथवोटरबद्दल मला विचारत असता, म्हणून आम्ही ते ठेवले आहे”.
हॉलिवूड अभिनेत्री सिडनी स्वीनीचे ही साबणाची पोस्ट पाहून वापरकर्त्यांनी संताप दर्शविला आहे आणि अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. एकाने लिहिले आहे की, “तुम्हाला आरशात स्वत: ला पाहण्याची गरज आहे”. तर दुसर्याने लिहिले आहे की, “हे होऊ शकत नाही”. तर आणखी एकाने लिहिले, “मला तु आवडतेस, पण तू हे जे काही करत आहेस ते खूप विचित्र आणि चिप आहे”.