Aly Goni Viral Post : २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा सूड भारताने उगवला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने काश्मीरला चांगलीच अद्दल शिकवली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, अभिनेता अली गोनी याने हे प्रकरण पाहता आणखी काळजी असल्याचं प्रेक्षकांना सांगितलं. अली गोनीने जम्मूमध्ये रहाणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आणि एक उत्कट पोस्ट शेअर केली. यावेळी त्याने या पोस्टद्वारे भारत-पाक लढ्याबाबत काळजीत असल्याचं म्हटलं. कारण अली गोनीचे संपूर्ण कुटुंब सध्या जम्मू येथे स्थित आहे. आणि काश्मीरमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता त्याने कुटुंबाची काळजी वाटत असल्याचं म्हटलं.
खरं तर, ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानने जम्मूसह भारतातील अनेक शहरांवर हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्याने योग्य उत्तर दिले आहे. दरम्यान, अली गोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये, अभिनेत्याने जम्मूमध्ये राहणाऱ्या आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.
अली गोनी यांनी कुटुंबासमवेत अनेक फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “मला अजिबात झोप लागली नाही, मी आतून पूर्णतः तुटलो आहे. यावेळी, मी भारताबाहेर अडकलो आहे आणि जम्मूमधील माझ्या कुटुंबाला काल रात्रीच्या हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. माझे संपूर्ण कुटुंब, मुले आणि पालक ड्रोन्स आणि अशांततेच्या दहशतीचा सामना करीत आहेत, तरीही काही लोक आरामात त्यांच्या घरात बसून सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत आणि या युद्धाचा गौरव करीत आहेत”.
आणखी वाचा – “त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…
अलीने पुढे असे लिहिले आहे की, “सीमेजवळ राहणाऱ्या लोकांसाठी हे इतके सोपे नाही. आमच्या आयएएफ आणि भारतीय सैन्याचे आभार. मी सुरक्षा आणि शांततेसाठी प्रार्थना करीत आहे”. अभिनेत्यानेही आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. अनेक सेलिब्रिटींनी अलीच्या या पोस्टवर भाष्य केले आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना केली.