Aishwarya Narkar And Avinash Narkar : रोजच्या कामाच्या वेळातून वेळ काढत अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचे, परदेशवारी करण्याचे अनेक प्लॅनिंग्स करत असतात. यांत कलाकार मंडळी तर आवर्जून त्यांच्या शुटिंग श्येड्युलमधून ब्रेक घेत कुटुंबाला वेळ देताना दिसतात. अशातच मराठी सिनेविश्वातील एक लोकप्रिय कलाकार जोडी सध्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. भारताबाहेर व्हिएतनाम शहरात ही जोडी धमाल-मस्ती करताना दिसत आहे. ही जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर सध्या व्हिएतनाम येथे फिरायला गेले आहेत. तेथील अनेक व्हिडीओ, फोटो ते सोशल मीडियावरुन शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत आहेत. अशातच ऐश्वर्या व अविनाश यांचा एक व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश व्हिएतनाम दौऱ्यात सध्या एन्जॉय करताना दिसत आहेत. “Vietnam ला आल्यावर नवीन शहरांची नावे लक्षात ठेवण्याचा उपाय”, असं कॅप्शन देत त्यांनी धमाल मस्ती करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिएतनामला गेल्यावर तेथील शहरांची नावे कशी लक्षात ठेवायची यावरुन त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. #da nang असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. da nang हे व्हिएतनाममधील एक शहर असून या शहराचे नाव लक्षात ठेवायला ते डान्स करत da nang da nang हे गाण्याच्या स्वरूपात म्हणत ठेका धरत आहेत.
आणखी वाचा – दीपिका कक्करला गंभीर आजार, लवकरच मोठी शस्त्रक्रिया होणार, नवरा म्हणाला, “विकृतात…”
यावेळी ते प्रवासी बसने प्रवास करत असताना तेथील उपस्थित एक भारतीय नागरिकही अविनाश यांच्या साथीला ठेका धरताना दिसत आहेत. एक कलाकार असूनही यावेळी अविनाश व ऐश्वर्या यांचा साधेपणा लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्या व अविनाश यांचे नेहमीच सगळेच व्हिडीओ चर्चेत असतात. मात्र हा व्हिडीओ अधिक खास आहे कारण दोघेही परदेशात जाऊनही त्यांची तीच धमाल-मस्ती अनुभवताना दिसत आहेत. अनेकांना त्याचा हा व्हिडीओ आवडला असून या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Video : आईच्या मृतदेहासमोर दोन भावांमध्ये राडा, लेक चितेवर झोपला अन्…; स्मशानभूमीत पुढे असं काही घडलं की…
ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे त्यांच्या व्हिडीओमुळे अनेकदा ट्रोलही झाले आहेत. मात्र ऐश्वर्या या ट्रोलिंगला नेहमीच प्रतिउत्तर देताना दिसतात. ऐश्वर्या नारकर या नेहमीच त्यांचे हटके डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्या बऱ्यापैकी सक्रिय असतात. बरेचदा त्या त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांच्यासह डान्स व्हिडीओ बनवून पोस्ट करतात. या नारकर कपलचे डान्स व्हिडीओ बरेच चर्चेत आलेलेही पाहायला मिळाले आहेत.