एखादा चित्रपट जेव्हा वादाच्या बोव्र्यात अडकतो तेव्हा त्याचा फायदा किंवा नुकसान दोन्ही गोष्टी होऊ शकतात. असाच काहीस झालाय प्रभासच्या आगामी आदिपुरुष या प्रभू श्री राम यांच्या रामायणावर आधारित चित्रपटाबाबत. चित्रपटाच्या पहिल्या टीजर वरून या चित्रपटाला प्रचंड विरोध करण्यात आला. मात्र प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन चित्रपटाच्या निर्मात्यांकडून या चित्रपटात योग्य ते बदल करण्यात आले. चित्रपटाचा नवीन टिझर, ट्रेलर लाँच करण्यात आला आणि नव्याने पोस्ट करण्यात आलेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.(Adipurush in 400 Club)
विशेष म्हणजे हाती आलेल्या माहितीनुसार ट्रोल झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ४०० कोटींची कामे केल्याचं सांगितलं जातंय. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार आदिपुरुष या चित्रपटाचे हक्क दोन राज्यांमध्ये विकले गेले आहेत आणि यांची रक्कम सुमारे १७० कोटींच्या आसपास आहे आणि प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स ने या चित्रपटाचे हक्क २३० कोटींना विकत घेतले आहेत. या मिळालेल्या माहिती नुसार आदिपुरुष या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ४०० कोटींच्या घरात प्रवेश केला आहे.
हे देखील वाचा –पहिल्या बायकोचे अंत्यसंस्कार आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा भावुक निर्णय पाणावले होते सगळ्यांचे डोळे…

आदिपुरुष चित्रपटात दाक्षिण्यात अभिनेता प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन हे दोघे मुख्य भूमिकेत आहेत. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे सुद्दा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिगदर्शन सुद्दा मराठी मधील प्रसिद्ध दिगदर्शक ओम राऊत यांनी केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलर, टिझर सोबतच चित्रपटांची गाणी सुद्दा आता ट्रेंडिंग वर दिसत आहेत. या गाण्यानंमध्ये सुद्धा मराठीतील प्रसिद्ध गायक जोडी अजय अतुल यांचा मोठा वाटा आहे. तर आता प्रदर्शनापूर्वी ४०० कोटींची कमाई करणारा आदिपुरुष प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.