अनेक कलाकार आपल्या जुन्या आयुष्याबद्दल फारसं बोलताना दिसत नाहीत. पण काही कलाकार मात्र अगदी दिलखुलास पणे प्रेक्षकांसोबत सगळं शेअर करतात. असाच आपल्या जुन्या बॉयफ्रेंड बद्दल एक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत मृणाल ने तीच्या बॉयफ्रेंड सोबत झालेल्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.(Mrunal Thakur Ex Boyfriend)
मृणाल ने तिच्या मुलाखतीत सांगितले माझा आधीचा बॉयफ्रेंड मी चित्रपटात काम करते म्हणून मला सोडून गेला. तो म्हणाला त्याच्या घरच्यांना हे सगळं आवडत नाही आणि मला देखील हे माहिती होत की त्याच्या घरचे पुरोगामी विचाराचे आहेत. त्यामुळे हे एक ना एक दिवस होणारच होत. आमचं नातं संपलं आणि एकाअर्थी ते बरच झालं गोष्टी हाता बाहेर जाण्या आधी त्या समजूतदारपणे संपलेल्या केव्हा ही चांगल्या.
मृणाल ने तिच्या आयुष्यात आलेला हा अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.

अनेक चित्रपटांमधून मृणाल ने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही काळापूर्वी प्रदर्शित झालेला मृणालची मुख्य भूमिका असलेला सीता रामम हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. चित्रपटातील गाणी आणि मृणालच्या लूक सर्व स्थरांमधून कौतुक ही केलं गेलं होत.(Mrunal Thakur Ex Boyfriend)
या आधी मृणाल ने जर्सी, सुपर ३०, गुमराह अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच कुंकुम भाग्य, अर्जुन अशा अनेक मालिकांमधून देखील प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.