Tinnu Anand On Trolling : सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते टिनू आनंद सध्या भटक्या कुत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भटक्या कुत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याने त्यांना बर्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. भटक्या कुत्र्यांबाबतची पोस्ट शेअर करत टिनू यांनी हॉकीने भटक्या कुत्र्यांना मारहाण करण्याविषयी लिहिले. यावर अनेकांनी भाष्य करत टिनू यांना धारेवर धरले. मात्र आता या ट्रोलिंगवर अभिनेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्याने सांगितले की, भटक्या कुत्र्यांमुळे त्याने ९० हजार रुपये गमावले आहेत आणि त्याच्या लेकीच्या जीवावरही हे बेतलं असतं. या सगळ्या प्रकरणामुळे टिनू आनंद चर्चेत आले आहेत.
फ्री प्रेस जर्नलशी झालेल्या संभाषणात टिनू आनंद म्हणाले की, “माझ्या मुलीचे हाताचा मनगट तुटले आहे आणि एका महिन्यापासून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिच्या या उपचारासाठी आतापर्यंत ९० हजार रुपये खर्च आला”. टिनू यांनी सांगितले की, तीन भटक्या कुत्र्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला आणि त्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यात त्यांची लेक मध्ये पडली तेव्हा तिचे मनगट तुटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर टिनू यांना बरंच ट्रोल करण्यात आलं. आता या ट्रोलर्सला टिनू यांनी प्रतिउत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.
टिनू म्हणाले, “मला त्या कुत्रा प्रेमींशी बोलावे लागेल. जर ते त्या कुत्र्यांवर इतके प्रेम करतात, त्यांना खायला घालतात, त्यांची काळजी घेतात तर मग ते त्यांना स्वतःवर ताबा ठेवायला नाही शिकवत का?. मी ८० वर्षांचा आहे, जर कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर मला स्वत: ला वाचवण्याचा पूर्णपणे हक्क आहे. याचाच अर्थ असा आहे की हे लोकांना समजले पाहिजे. मी कुत्र्यांवर हल्ला करायला नाहीतर स्वतःला वाचवण्यासाठी हे बोललो. हा माझा हक्क आहे”.
आणखी वाचा – तीन वर्षांची असताना अॅसिड हल्ला, दृष्टी गेली अन् ‘ति’ने १२वीमध्ये मिळवले ९५ टक्के
“एका शूटनंतर परत येताना, मला भयानक कुत्रे भुंकताना दिसले आणि मला माहित नव्हतं की, ते पुढे कोणाला चावतील. आव्हान स्वीकारले. त्यांच्यांशी सामना करण्यासाठी माझ्याकडे हॉकी स्टिक आहे. मी सर्व श्वानप्रेमींना इशारा देत आहे. त्यांना घरी घेऊन जा नाहीतर माझ्या क्रोधाला सामोरे जा. माझ्या सोसायटीला आधीच माहिती देण्यात आली आहे”, अशी पोस्ट यापूर्वी टिनू आनंद यांनी केली होती.