एखादा कलाकार जास्त प्रसिद्ध नाही झाला तरी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहण्यासारखं काम त्याच्याकडून होत एवढं नक्की. ना प्रमुख भूमिकेचे चित्रपट, ना लाईमलाईट मध्ये जास्त येण्याची आस फक्त मिळेल त्या कामातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा काही कलाकारांचा हेतू असतो. असाच एक अभिनेता आपल्या चित्रपट सृष्टीत आहे. तो अभिनेता म्हणजे ३ इडियट्स, रंग दे बसंती, गोलमाल त्यांसारख्या धमाल विनोदी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता शर्मन जोशी. आज शर्मनचा वाढदिवस त्या निम्मिताने जाणून घेऊयात शर्मनच्या आयुष्यात त्याला त्याच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटातील भूमिकेसाठी काय स्ट्रगल करावा लागला त्या बद्दल.(Sharman Joshi struggle story)
विनोदी चित्रपटांमध्ये सहायक अभिनेत्याची भूमिका केल्या नंतर शर्मनची मुख्य भूमिका असणारा ‘ फरारी कि सवारी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण शरम ने एका मुलाखतीत सांगितले कि त्याला या चित्रपटासाठी तब्ब्ल ४० वेळा ऑडिशन द्यावी लागली होती. त्या नंत्तर त्याला या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आल. १९९९ साली गॉडमदर हा त्याचा पहिला चित्रपट होता त्या नंतर पुन्हा मुख्य भूमिकेत काम करण्यासाठी त्याला तब्बल १३ वर्ष वाट बघावी लागली होती.

या दरम्यानच्या काळात गोलमाल मधील लक्ष्मण, रंग दे बसंती मधील सुखी किंवा ३ इडियट्स मधील राजू शर्मनच्या या भूमिका कायमच लक्षात राहण्यासारकजह्या आहेत किंबहुना त्याच्या या भूमिका त्याने साकारलेल्या प्रमुख भूमिकांपेक्षा प्रेक्षकांना जास्त आवडलेल्या दिसतात.
कॉलेज लाईफ मधील मित्रांसोबत पाहिलेली दुनियादारी, मिळालेले अनुभव, सोडून गेलेल्या मित्राची आठवण या साऱ्यांवर भाष्य करणाऱ्या ३ इडियट्स मधील शर्मन ने साकारलेला राजू हा आजही प्रेक्षक विसरले नाहीत.
हे देखील वाचा – ‘लोकनाट्याला उशीर झाला तरी चालेल पण याची चांगलीच जिरवायची…’ म्हणून दादा कोंडके यांनी जिरवली होती ‘त्या’ हॉटेल वाल्याची खोड
आधी पासून होता कलेचा वारसा पण…
शर्मन चित्रपट सृष्टीत येण्याआधी त्याचे वडील सुप्रसिद्ध गुजराती कलाकार अरविंद जोशी हे सुद्धा या क्षेत्रात आघाडीवर होते. आणि शर्मनचा पहिला चित्रपट गॉडमदर हा सुद्दा गुजराती भाषेतच होता. अनेक मुलाखतींमद्धे शर्मन ने नेहमी सांगितली आहे कि सुरुवातीच्या काळात अनेकदा लोकांनी टीका केली करणं त्याच्या विनोदाचं टायमिंग योग्य न्हवतं. (Sharman Joshi struggle story)

तब्बल ५० कार्यक्रमांनंतर त्याच्या विनोदांमध्ये ती मज्जा येऊ लागली लोकांना ते आवडू लागलं. लोकांच्या टीकांमुळे खचू न जाईनच श्रेय त्याने त्याच्या आयुष्यात दिगदर्शक म्हणून लाभेल्या दिगदर्शकांना दिल आहे. शर्मन म्हणतो कि त्याला प्रमुख भूमिका साकारउन केवळ चित्रपट करायचे नाहीतर तर चांगले चित्रपट करायचे आहेत. आयुष्यत १० चांगले चित्रपट करणं हे माझं स्वप्न आहे असं देखील शर्मन नेहमी त्याच्या मुलाखतींमध्ये सांगतो.