यंदाच्या दिवाळी सणाला नुकतीच सुरवात झाली असून यानिमित्त सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विविध रोषणाईचे दिवे, आकाश कंदील, पणत्या यांची बाजारात रेलचेल झाली आहे. घराघरांत रोषणाई केली जात आहे. सर्वजण आपल्या घरात दिव्यांची रोषणाई करत आहेत. सर्वसामान्यांसह कलाकारांमध्येही दिवाळीच्या सणानिमित्त आनंद व उत्साह आहे. यापैकी एक म्हणजे मराठी अभिनेता कुशल बद्रिके. कुशलच्या घरीही दिवाळीनिमित्त रोषणाई केली जात आहे. (Kushal Badrike Wife Teased Him)
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता कुशल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. कुशल बद्रिके हा पडद्यावर जितका विनोदी आहे, तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील गंमतीशीर आहे. कुशलचा सुनयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा मित्र-मैत्रिणीचे नाते असल्याचे कायमचं पाहायला मिळाले आहे. कुशल आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

आणखी वाचा – मृणाल कुलकर्णींच्या आईचे निधन, भावुक होत म्हणाल्या, “काही व्यक्त होण्याची ताकद नाही पण…”
दिवाळीनिमित्त घरी रोषणाई केली जात असताना त्याची पत्नी सूनयनाने त्याचा दिवे लावतानाचा एक फोटो शेअर करत “काय दिवे लावणार आहे कुणास ठाऊक” असं म्हटलं आहे. यावर कुशलनेही पत्नीची पोस्ट री-शेअर करत संध्याकाळी पेटले की कळतील” असं मजेशीर उत्तर दिलं आहे. त्यानंतर कुशलने संध्याकाळी दिवे पेटल्यानंतरचा त्याबरोबर स्वतःचा सेल्फी फोटो शेअर केला आहे आणि “दिवे लागले” असं आपल्या पत्नीला म्हटलं आहे. तसंच या फोटोमध्ये त्याने पत्नी सूनयनाला टॅगही केलं आहे.

आणखी वाचा – 30 October Horoscope : शुभ योगामुळे मेष, कर्क व मीन राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या…
दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. या शोमधून विनोदी स्किट्स करत त्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. यानंतर त्याने मॅडनेस मचाएंगे या हिंदी कॉमेडी शोमध्येही सहभाग घेतला होता. कुशल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो.