‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन हे दोघे चर्चेत आले. मुग्धा व प्रथमेशने थेट आमचं ठरलं म्हणत सोशल मीडियावरुन प्रेमाची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर पारंपरिक अंदाजात दोघांची डेस्टिनेशन वेडिंग करत शाही विवाहसोहळा केला. दोघांच्या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले. लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश दोघेही बरेच चर्चेत असलेले पहायला मिळाले. सोशल मीडियावर मुग्धा व प्रथमेश दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर या जोडीला प्रेक्षकही भरभरुन प्रेम करताना दिसतात. (Prathamesh Laghate Video)
प्रथमेश हा मूळचा कोकणातील आहे. कोकणातील आरवली हे त्याचे गाव आहे. त्यामुळे यंदाच्या लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सव सणाला मुग्धा-प्रथमेशने कोकण गाठलं आहे. मुग्धाची सासरवाडी कोकणात आरवली येथे असून सासरच्या गणपती बाप्पाची झलक काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिने शेअर केली होती. मुग्धाच माहेर हे अलिबाग येथील आहे. मात्र ती कोकणात सासरी जायला नेहमीच उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. दोघेही लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव साजरा करायला कोकणात गेले असल्याचं पाहायला मिळालं.
इतकंच नव्हे तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी प्रथमेशने स्वतःच्या हाताने मोदक बनवले असल्याचं समोर आलं आहे. प्रथमेशच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये प्रथमेश उकडीचे मोदक बनवताना दिसत आहे. विधीनुसार उकडीचे मोदक बनवतोय असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी प्रथमेशचाही पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुग्धानेही उकडीचे मोदक बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
आणखी वाचा – पूजा सावंतची गणपतीत सत्यनारायणाची पूजा, नवऱ्यासह केला अधिक खास लूक, वेधलं लक्ष
बायकोच्या स्वयंपाकापुढे प्रथमेशने बनवलेले उकडीचे मोदक अधिक लक्ष वेधून घेत आहेत. या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव झालेलाही पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट करत, “वाटच बघत होते तुझ्या मोदकाची.मस्तच”, असं म्हणत कमेंट केली आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी मोदक छान बनवला अशी कमेंट केली आहे.