महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून शिवाली नावारूपास आली. शिवालीने वेगवेगळे स्किट सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. याच बरोबर शिवाली “पोस्ट ऑफिस उघडं आहे” या मालिकेत अभिनय करताना देखील दिसली. याचप्रमाणे शिवाली अनेक फोटोशूटचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा करत असते. शिवालीच्या स्किट प्रमाणे शिवालीचे फोटोज सुद्धा चर्चेत असतात. शिवालीने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Shivali Parab)

शोच्या कलाकारांनी संपुर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवलंय. या शोमधील कलाकारांच्या योग्यवेळी मारलेल्या पंचमुळे शोचा प्रेक्षक वर्ग प्रचंड वाढलाय. म्हणून या कार्यक्रमाच्या कलाकारांवर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आहे. या कार्यक्रमातील विनोदी अभिनेत्री शिवाली परब तिच्या फोटोंच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. शिवाली हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
हे देखील वाचा: अश्विनीने शेअर केली शाहीर साबळेंसोबतची खास आठवण
या फोटोमध्ये शिवालीने व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केला आहे. तसेच कपाळावर चंद्रकोर, गळ्यात मोत्याचं नेकलेस आणि केसात एक सफेद गुलाबाचं फुल माळ्याने शिवाली चं रूप आणखीनच खुलून आलंय. शिवालीने या फोटोला “आओ नजरो से बात करते हैं, लफ्ज मतलब बिगाड देते है !” म्हणजेच शब्द अर्थ बदलून टाकतात, त्यामुळे माझ्याशी नजरेने चं बोला असे शायराना अंदाजातले कॅप्शन दिले आहे. (Shivali Parab)
हे देखील वाचा: ‘मुलं लहान असताना त्यांच्यासोबत वेळ घालवणं, लाड करणं कधी प्रसादला जमलंच नाही पण ….’ मंजिरीने सांगितली प्रसादाची ती भावुक बाजू….
शिवालीच्या या फोटोवर एका चाहत्याने “आपकी नजर किसके पास है, ओ तो बताओ” असे कमेंट करून विचारले आहे. याच प्रमाणे शिवालीच्या या फोटोवर अनेक जणांनी तिला ब्युटीफुल, गॉर्जस तसेच एक्सलेन्ट अशा कमेंट आल्या आहेत