अवघ्या देशभरात सध्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत व वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. हा विवाह भारतातील सर्वात महागड्या आणि प्रसिद्ध विवाहांपैकी एक मानला जातो. काल म्हणजेच १२ जुलै, शुक्रवारी हा विवाहसोहळा झाला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या लग्नाला हजेरी लावण्यासाठी बॉलीवूड स्टार्स, राजकारणी, क्रीडा आणि व्यावसायिक जगतातील नामांकित व्यक्ती हजर झाले होते. या शाही विवाह सोहळ्यात अनेकांनी ठेका धरला. बॉलिवूडमधील रणवीर, अनन्या पांडे यांसह अनिल कपूर, रजनीकांत यांसारख्या अनेक कलाकारांनी डान्स केला
योगगुरु बाबा रामदेवदेखील या सोहळ्यात सहभागी झाले होते आणि त्यांनीदेखील या खास क्षणी ठेका धरला. शुक्रवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या भव्य विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये बाबा रामदेव यांनी अनंत योगगुरु बाबा रामदेव यांच्याबरोबर डान्स केला. त्यांच्याबरोबर त्यांचे जवळचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनीही लग्नाला हजेरी लावली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेव अनंत अंबानी बाबा रामदेव यांचा हात धरून नाचताना दिसत आहेत. यानंतर बाबा रामदेव यांनीही अनंतला मिठी मारली.
या शाही लग्नसोहळ्याला बॉलीवूडच्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, रणवीर कपूर, रणबीर सिंह, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, विकी कौशल, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सारा अली खान, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख अशा अनेक कलाकारांनी अनंत-राधिकाच्या लग्नात खास उपस्थिती लावली होती.
दरम्यान, अनंत अंबानी-राधिकाच्या मर्चंटच्या लग्नसोहळ्यानंतर आज १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.