बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही अधिक चर्चेत असते. आजवर सोनाक्षीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. २०१० साली तिने सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील सोनाक्षीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. ती वेगवेगळ्या चित्रपटामध्ये भूमिका साकारत गेली आणि सध्या मनोरंजन क्षेत्रांमध्ये तिने आपले एक वेगळे अस्तित्त्व निर्माण केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. स्वतःचे अनेक फोटो व व्हिडीओ ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. (sonakshi sinha on wedding)
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी म्हणून चित्रपत्रसृष्टीमध्ये येण्यापूर्वी तिची ओळख होती. मात्र आता एक चतुरस्त्र अभिनेत्रीमध्ये सोनाक्षीचे नाव घेतले जाते. मात्र सध्या ती अभिनयामुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोनाक्षीचे नाव गेले अनेक दिवसांपासून जहीर इक्बाल बरोबर जोडले जात आहे. या महिन्यात दोघंही लग्न करु शकतात अशा चर्चादेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. मात्र सोनाक्षी व जहीर यांनी आपल्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केली नाही. मात्र एकमेकांना खूप कालावधीपासून एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्नबंधनात अडकतील अशा आशयाची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली.
मात्र आता स्वतः सोनाक्षीने यावर मौन सोडले आहे. नुकत्याच तिने एका मुलाखतीमध्ये याबद्दल भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कोणाचेही काम नाही. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे, ही माझी मर्जी आहे. त्यामुळे लोकं माझ्यासाठी इतके का चिंतेत आहेत हे मला समजत नाही. लोक माझ्यापेक्षा जास्त माझ्या आई-वडिलांना माझ्या लग्नाबद्दल विचारत आहेत. खरं सांगायचं तर मला खूप मजा येत आहे पण आता मला या सगळ्यांची सवयदेखील झाली आहे. लोकांना खूप उत्सुकता आहे. पण त्याला आम्ही काय करु शकतो?”.
याबद्दल वडील शत्रुघ्न यांचे भाष्य देखील चर्चेत आले होते. ते म्हणाले होते की, “आजकालची मुलं कुठे काय विचारतात? ते फक्त सांगतात. जितकं सोशल मीडियावर आहे तितकीच माहिती मला सोनाक्षीबद्दल आहे. याव्यतिरिक्त सोनाक्षीने मला काहीही सांगितले नाही. पण जेव्हा तिचे लग्न असेल तेव्हा मी खूप नाचेन”.
दरम्यान सोनाक्षीच्या लग्नाच्या वृत्तामध्ये किती तथ्य आहे हे लवकरच समजेल.