आई कुठे काय करते ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नेहमी अव्वल स्थानावर पाहायला मिळते. या मालिकेतील अरुंधतीभोवती फिरणार कथानक हे चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरत. यातील सर्व पात्र चाहत्यांना आपलीशी वाटतात. मालिकेत सध्या अनेक अडचणींवर मात करत अखेर अरुंधती आणि आशुतोष यांचा शुभविवाह दणक्यात पार पडला.लग्नांनंतर अरुंधतीचा बदललेला लूक तिला मिळालेलं सुख पाहून चाहते देखील आनंदी झालेत.तिच्या या लूकची तर सोशल मीडियावर देखील चर्चा रंगली.यातच आता अरुंधती आणि आशुतोष यांचा संसार फुलताना दिसतोय.नुकतंच यांच्यातील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.या व्हिडिओत अरुंधतीच्या खांद्यावर हात ठेवताना देखील आशुला घाम फुटताना दिसून येतोय..(Aai Kuthe Kaay Karte update )

हा व्हिडीओ या मालिकेतील अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हिने शेअर केलाय. यात अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील हळूहळू फुलणाऱ्या प्रेमाची झलक पाहायला मिळते.यासोबतच तिने त्यांचा पहिला कँडल लाईट डिनरचा व्हिडीओ देखील शेअर केलाय.तिने शेअर केलेल्या व्हिडिओत कोणीतरी या नवविवाहित जोडीचा फोटो काढत आहे.हे फोटो काढताना आशुतोष घामाघूम झालेला दिसून येतो.एकीकडे व्हिडिओतील त्याचे एक्प्रेशन पाहून अनेकांना हसू आवरत नाही. तर दुसरीकडे व्हिडिओतील त्यांच्यातील ही जवळीक आणि अखेर अरुंधतीचा आनंद पाहून अनेक चाहते देखील सुखावलेत. चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवत, आशुतोषचा चेहरा पाहण्यासारखा झाला आहे, आम्ही हसून हसून फुटलो होतो हा सिन पाहताना, खूप भारी अश्या कॉमेंट केल्या आहे..(Aai Kuthe Kaay Karte update )

====
आणखी वाचा-आई आणि लेक होणार का एकाच घरच्या सुना?
====
अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून या मालिकेतील खास क्षण शेअर स्वतःचे ठामपणे मत मांडताना दिसते.अखेर तिची अनिरुद्धच्या जाळ्यातून सुटका झाल्याने ती आनंदी आहे पण आता पुढे तिच्या आणि आशूच्या सुखकर संसारात अनिरुद्ध किंवा इतर कोणी काय विघ्नआणणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.यासोबतच मालिकेत आता अनिशआणि इशा यांचा प्रेमाचा ट्रक पाहायला मिळत असून त्या दोघांना अरुंधती साथ देताना दिसते.