मराठी मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनया सोबतच त्यांच्या अदाकारी, सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. या अभिनेत्रींचे विविध फोटो सोशल मीडिया चांगलेच लोकप्रिय होतात. त्यांचे चाहते या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत त्यांचं कौतुक करत असतात. सुंदर सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ता माळी , सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर अशा अनेक अभिनेत्रींच्या यादीत एका नावाची अजून भर पडताना दिसत आहे ती अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार.(ashwini kasar photoshoot)

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या नारकर यांनी त्यांचे काही फोटोज सोशल मीडिया वर शेअर केले होते आणि अश्विनी ने सुद्दा त्याच लोकेशन वरचे तिचे काही फोटोज शेअर केले आहेत.
पहा अश्विनीचं खास फोटोशूट (ashwini kasar photoshoot)

अश्विनी तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. बरेचदा ती वेस्टर्न आऊटफिट घातलेल्या कपड्यांमध्ये फोटो शेअर करते पण अश्विनीला साडी मध्ये पाहणं रंजक ठरत. अश्विनीला हिरव्या रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

हिरव्या साडीत अश्विनीच फुललेलं सौंदर्य चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिने फोटोजच्या कॅप्शन मध्ये हे लोकेशन ऐश्वर्या नारकर यांनीच सुचवलं असल्याचं म्हणलं आहे.

====
हे देखील वाचा – “….और अविनाश भाऊ पिघलने लगा” नेटकऱ्यांची कमेंट चर्चेत
====
या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये अश्विनी अधिकच सुंदर दिसतेय. पाण्यात भिजलेले आणि ओलेचिंब झालेले फोटोही अश्विनीच ऐश्वर्य अधिक देखणं करतायत.(ashwini kasar photoshoot)

अश्विनीने पोस्ट केलेल्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तसेच इतर कलाकारांनी देखील कमेंट करत या फोटोजना पसंती दर्शवली आहे.
