मराठी नाट्यक्षेत्र दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. अनेक नाटकं कलाकारांकडून सादर केली जात आहेत. प्रेक्षकांच्या आशीर्वादनाने आणि कलाकारांच्या मेहनतीने बहरत चालेल्या नाट्यकलेला सरकारचा हातभार लागला आहे त्यामुळे अभिनेता संदीप पाठकने ट्विट करत सरकारचे आभार मानले आहेत. काही कलाकारांनी या आधी नाट्यगृहाच्या दुरुस्ती बाबत, स्वछ्तेबाबत तरतूद करण्याची सरकारकडे मागणी केली होती. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून नाटकं पाहण्यासाठी येतो पण नाट्यगृहाची बिघडलेली अवस्था बघून प्रेक्षकांचा हिरमुस होतो.(Sandeep Pathak post on theaters)
अशातच महाराष्ट्र सरकार ने सादर केलेल्या बजेट मध्ये सांस्कृतिक विभागासाठी १०८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्या घोषणेमुळे नाट्यगृह कर्मचारी आणि कलाकार त्यासोबाबतच नाट्यप्रेमी देखील सुखावताना दिसत आहेत. या घोषणे नंतर अभिनेता संदीप पाठकने नाट्यगृहाचा फोटो पोस्ट करत “नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी राज्यसरकारने ५० कोटींची तरतूद केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्हा सर्व कलाकारांची मागणी होती की नाट्यगृहांची चांगली देखभाल झाली पाहिजे, कारण प्रेक्षक ४०० रूपये खर्च करतो. आमच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल सरकारचे आभार ???? #नाट्यगृह #maharashtrabudget2023” असं कॅप्शन दिलं आहे.

सरकारचे आभार मानत संदीप ने केलेल्या या पोस्ट वर चाहत्यांनी हि भरभरून कमेंट्स केल्या आहेत. तर संदीपने सर्व कलाकारांनी पूर्वी पोआसून केलेली नाट्यगृह सुधारण्याची मागणी आता पूर्ण होईल अशा आशा संदीपने या पोस्ट मध्ये व्यक्त केली आहे. ४०० रुपये खर्च करून येणाऱ्या प्रेक्षकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये हि कोणत्याही कलाकाराची प्रामाणिक इच्छा असते.(Sandeep Pathak post on theaters)
====
हे देखील वाचा – ५ मे पासून बरसणार प्रेमाच्या ‘सरी’ अभिनेता अजिंक्य राऊतची नव्या चित्रपटाची घोषणा
====
नाट्यगृहाची ढासळली अवस्था आता सुधारणार का आणि नाटक पाहण्यासाठी उत्सुक असणारा प्रेक्षकवर्ग या गोष्टीमुळे अजून समृद्ध होणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.रंगमंचावर येणार प्रत्येक नाटक हे प्रेक्षकांना प्रेरित करत असत. नाटकाचे वेगवेगळे विषय शेवट पर्यंत प्रेक्षकांना खुरचूवार खिळवून ठेवतात. सरकारच्या या निर्णयाने नाट्यगृह आता आणखी चांगल्या पद्धतीत प्रेक्षकांच्या सोयीसाठी उपलब्ध होतील अशी अशा रंगकर्मीयांना आहे. या निर्णया मुले कलाकारांना प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अजून बळ, प्रेरणा मिळेल एवढं नक्की.