कलाकार हा त्याच्या पडद्यावरच्या कामासोबतच इतर गोष्टींमुळेही चर्चेत असतो. यशाचे कितीही मनोरे गाठले तरीही पाय जमिनीवर असणं हे एका चांगल्या कलाकाराचं लक्षण आहे. एखादा कलाकार त्याच्या आयुष्याचा प्रवास सांगताना नेहमी मदत केलेल्या किंवा आधार असलेल्या व्यक्ती बद्दल सांगत असतो. अशाच हटके अंदाजात आपल्या जवळच्या व्यक्तीचे आभार मानताना अभिनेत्री मीनाक्षी राठोड ने लिहिलेलं कॅप्शन चाहत्यांसह इतर कलाकारांचं ही लक्ष वेधत आहे.(Meenakshi Rathod Kailas Waghmare)
काल जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. अशा वेळी अनेकांनी आपल्या आयुष्यातील महत्वाच्या स्त्री व्यक्तिमत्वाला शुभेच्छा दिल्या परंतु अभिनेत्री मीनाक्षी ने पती, अभिनेता कैलासलाच महिला दिनाच्या हटके शुभेच्छा इंस्टाग्राम वर मुलगी यारा सोबतचा एक फोटो पोस्ट करत दिल्या आहेत.
====
हे देखील वाचा- लवकरच करणार ‘गोस्वामी पाणीपुरी सेंटर’ ची सुरुवात
====
मीनाक्षीने इंस्टाग्राम अकाउंट वरून कैलास आणि मुलगी याराचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं आहे “कॅालेज पासून माझी कधीच girl – friend नव्हती.जे काही gossip होतं ते तुझ्यासोबतच केलं. माझ्यातल्या स्त्री ला मैत्रीण बनून अनेक पैलू पाडलेस. आणि आता यारा ची आई होऊन, तीला घडवतोयस. माय ने दिलेली संस्काराची शिदोरी बेमालूमपणे आमच्या वर रीती करत जातोस. माझ्या माघारी डोळ्यात तेल घालून यारा ला मोठं करतोस . तुझ्यातल्या स्त्री चं वारंवारं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला षुरूषासारखं बिनधास्त कामावर पाठवणार्या माझ्या मैत्रीणी तुझ्यातलं बाईपण आमच्या दोघीत झिरपत राहो ❤️”

काय आहे मीनाक्षीची पोस्ट?(Meenakshi Rathod Kailas Waghmare)
महिलादिनी आपल्या आयुष्यात वेळोवेळी मैत्रीण, आई अशा अनेक भूमिका निभावलेल्या पुरुष व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देत मीनाक्षीने चाहत्यांची मन जिंकली आहेत. पोस्ट मध्ये तिने त्यांच्या कॉलेज पासूनचा नात्या बद्दल सांगितलं आहे. त्यानंतर एक मैत्रीण होऊन तू वेळो वेळी मला स्वतःला ओळखायला शिकवलंस आणि आता मी किती ही व्यस्त असले तरीही याराची अगदी आई होऊन काळजी घेत डोळ्यात तेल घालून तू जपत असतोस. अशा प्रेमळ भाषेत आपल्या भावना व्यक्त करत मीनाक्षी ने पुढे लिहिलं आहे तुझ्या मध्ये दडलेल्या स्त्रीच ही कौतुक करावं तेवढं कमी आहे.(Meenakshi Rathod Kailas Waghmare)

अशा शुभेच्छा या सगळयांना त्यांच्या कामाप्रती, कर्तव्याप्रति सुजाण राहण्याची प्रेरणा देतात. मीनाक्षी ने छोट्या पडद्यावर अभिनय सादर करत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे तर कैलासचा नुकताच ‘घोडा’ हा चित्रपट रिलीज झाला असून प्रेक्षकांचा त्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय.