शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : गौतमी देशपांडेच्या मेहंदी सोहळ्यात बहीण मृण्मयीचीच हवा, जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, पाहा खास क्षण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 24, 2023 | 1:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage

गौतमी देशपांडेच्या मेहंदी सोहळ्यात बहीण मृण्मयीचीच हवा, जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, पाहा खास क्षण

Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. एकामागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘माझा होशील ना’ फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. स्वानंद तेंडुलकर बरोबर असलेल्या रिलेशनशिपमुळे मध्यंतरी गौतमी चर्चेत आली होती. मात्र तिने तिच्या नात्याचा जाहीर खुलासा केला नाही. त्यानंतर गौतमीची बहीण मृण्मयीने सुरु केलेल्या तयारीवरुन लग्नाची कुणकुण लागून राहिली होती.

अखेर काल गौतमीने तिच्या मेहंदी समारंभाचं औचित्य साधत सोशल मीडियावरुन होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. ही प्रेमाची कबुली देताच गौतमी व स्वानंदच्या नात्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता लवकरच ही जोडी बोहोल्यावर चढणार आहे. मृण्मयीने बहिणीच्या संगीत सोहळ्याची तसेच केळवणाची तयारी करतानाचे व्हिडीओ शेअर केले होते. त्यानंतर गौतमीच्या मेहंदी सोहळ्यातील फोटोही सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले.

आणखी वाचा – ‘…म्हणून आम्ही कमेंट सेक्शन बंद केलं नाही’, पियुष-सुरुची स्पष्टचं बोलले, म्हणाले, “कोणाचंही सर्टिफिकेट नको…”

मेहंदी सोहळ्यासाठी गौतमीच्या खास लूकचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळालं. गौतमीने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यांत तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर स्वानंदने गौतमीच्या लेहेंग्याच्या रंगाला साजेसा गुलाबी रंगाचा जॅकेट आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान होता. दोघांचा मेहंदी सोहळ्यातील हा लूक चांगला चर्चेत आला आहे. दरम्यान, या सोहळ्यात गौतमीची मोठी बहीण मृण्मयी देशपांडेच्या लुकचीही चर्चा झाली. मृण्मयीने बहिणीच्या मेहंदी समारंभात खणाचा ड्रेस परिधान केला होता.

View this post on Instagram

A post shared by K2fashioncloset (@k2fashioncloset)

आणखी वाचा – दिशा परमार व राहुल वैद्यच्या लेकीची पहिली झलक आली समोर, नाताळचं औचित्य साधत आईनेच मुलीचा चेहरा दाखवला आणि…

गौतमीच्या मेहंदी सोहळ्यात डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये गौतमीसह मृण्मयी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तसेच त्यांचे इतर कुटुंबीयही थिरकताना पाहायला मिळत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गौतमीच्या मेहंदीला मृणमयी भाव खाऊन गेली आहे. दोघी बहिणींचा धमाल मस्ती करत ठेका धरतानाच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Tags: gautami deshpande mehendigautami deshpande weddingmarathi actressmrunmayee deshpandemrunmayee deshpande sister
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
bigg boss 17 isha malviya evicted actress aishwarya sharma from the house video viral on social media

Bigg Boss 17 : ईशा मालवीयमुळे ऐश्वर्या शर्माची 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट, अभिनेत्री म्हणाली, "म्हणून मी तिला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.