मंडळी समजातील एखाद्या प्रतिष्ठित, साहसी, हुशार व्यक्तिमत्वा बद्दल इतिहासात बरीच माहिती आहे पण त्या व्यक्तित्वच्या बाजू बाजू मांडण्यासाठी त्याच्या आयुष्यावर एखादा चित्रपट, वेब सिरीज बनवली जाते. बायोपिक्सच्या या शर्यतीत मराठी इंडस्ट्रीतील एक नाव अगदी हक्काने घेतलं जात ते म्हणजे अभिनेता सुबोध भावे. बालगंधर्व ते डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आता इतिहासातील एक असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे अकबर दरबारातील बुद्धी चातृर्याने समृद्ध असणारा ‘बिरबल’ साकारताना सुबोध भावे दिसणार आहे

बायोपिक म्हणजे सुबोध भावे अशी म्हणं आहे असं म्हणायला आता हरकत नाही. सुबोध ने इंस्टाग्राम वर एक पोस्ट करत त्याच्या आगामी बायोपिक असणाऱ्या वेब सिरीज बद्दल माहिती दिली आहे ‘ताज – डिव्हायडेड बाय ब्लड’ असं त्याच्या आगामी वेब सिरीजच नाव आहे. ही वेब सिरीज झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज करण्यात येणार आहेत. अकबरच्या दरबारात बुद्धी कौशल्यात तरबेज असणाऱ्या बिरबल या पत्रावर आधारित ही वेब सिरीज असणार आहे.
====
हे देखील वाचा- पुन्हा एकदा प्रेमात पाडायला येतोय ‘दोन कटींग’ भाग ३
====
सुबोध ने पोस्ट केलेल्या टिझरच्या कॅप्शन खाली त्याने लिहिले आहे “लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या,ज्याच्या हुशारी वर प्रेम केलं त्या ” बिरबल ” ची व्यक्तिरेखा या आगामी वेब मालिके मध्ये साकारताना अत्यंत आनंद होतोय. लवकरच काही दिवसात ही वेब मालिका तुम्हाला @zee5 वर पाहता येईल. Mughal
saltanat ke #TAJ ki kahani jald aa rahi hai! Ab khulenge #TAJKeRaaz” सुबोधच्या या पोस्ट वर चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनी ही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.