मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 31, 2025 | 2:00 pm
in Lifestyle
Reading Time: 3 mins read
google-news
Sydney Sweeney To Launch Soap 

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

Sydney Sweeney To Launch Soap  : अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्वीनीने असे काहीतरी केले आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि सर्व क्षेत्रातून तिच्यावर टीका केली जात आहे. खरंतर, सिडनीने एक नैसर्गिक साबण बनविण्यास सुरुवात केली आहे, जो तिच्या आंघोळीच्या पाण्यापासून बनविला गेला आहे. आता या साबणाची विक्री ही मर्यादित काळासाठी बाजारात सुरु केली जाईल. आणि ही खरेदी आपण केवळ १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटात असाल तेव्हाच करू शकता. ऐकावं ते नवलंच. स्वतःच्याच अंघोळीच्या पाण्याचा साठा करुन अभिनेत्रीने साबण बनविण्यास सुरुवात केली हे हास्यास्पद आहे. पण हो, तिने याची विक्री सुरु केली असून याकडे ती एका व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत आहे.

‘युफोरिया’ या हिट वेबसीरिजमधून चर्चेत आलेल्या सिडनी स्वीनीला विशेष लोकप्रियता मिळाली. यासाठी स्वीनीने स्क्वॉच नावाच्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ही कंपनी नैसर्गिक आणि घरगुती साबणासाठी प्रसिद्ध आहे. हे साबण बनवण्यासाठी सिडनी स्वीनीने तिच्या आंघोळीचे पाणी देखील जोडले गेले आहे. साबणाचे नाव ‘सिडनीज बाथवॉटर ब्लिस’ असे ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा – “माझा अपघात झाला तेव्हा…”, पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफांचा कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “लोकांनी तर…”

View this post on Instagram

A post shared by Dr. Squatch (@drsquatch)

सिडनी स्वीनीच्या साबणाची किंमत नेमकी किती

या साबणाची किंमत ६८४ रुपये ठेवली गेली आहे. या साबणाची विक्री सहा जून रोजी बाजारात अधिकृतपणे सुरु केली जाईल. सिडनी स्वीनी यांनी इन्स्टाग्रामवर या साबणाबाबत जाहीर केले, ज्याने लिहिले की, “तुम्ही लोक डॉ. स्क्वॉचच्या जाहिरातीनंतर माझ्या बाथवोटरबद्दल मला विचारत असता, म्हणून आम्ही ते ठेवले आहे”.

आणखी वाचा – आठ वर्षांचा सुखी संसार; लग्नाच्या वाढदिवसाला नवऱ्याबद्दल भरभरुन बोलली ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची पत्नी, म्हणाली, “ हे सुंदर आयुष्य…”

हॉलिवूड अभिनेत्री सिडनी स्वीनीचे ही साबणाची पोस्ट पाहून वापरकर्त्यांनी संताप दर्शविला आहे आणि अभिनेत्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. एकाने लिहिले आहे की, “तुम्हाला आरशात स्वत: ला पाहण्याची गरज आहे”. तर दुसर्‍याने लिहिले आहे की, “हे होऊ शकत नाही”. तर आणखी एकाने लिहिले, “मला तु आवडतेस, पण तू हे जे काही करत आहेस ते खूप विचित्र आणि चिप आहे”.

Tags: entertainmenttrending newsViral News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Ali aslgar says no to female roles
Entertainment

अचानक कुठे गायब झाला अली असगर?, स्त्री पात्रांना तोंडावर नकार, मुलांना टोमणे मारायचे म्हणून…; आता अभिनेता काय करतो?

जून 3, 2025 | 3:17 pm
usha Nadkarni ankita lokhande
Entertainment

“मला काय झालं तर कोण बघणार?”, ७९व्या वर्षीही एकट्याच राहतात उषा नाडकर्णी, परिस्थिती सांगताना रडू कोसळलं अन्…

जून 3, 2025 | 1:34 pm
Next Post
Farah Khan Big Statement

"'शीला की जवानी' आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे", स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, "अश्लील…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.