रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझी मुलगी तर गेली…”, भरल्या डोळ्यांनी हात जोडत वैष्णवीच्या वडिलांची विनंती, म्हणाले, “एखाद्या लेकराबाबत असं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 29, 2025 | 5:56 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Vaishnavi hagawane death case

"माझी मुलगी तर गेली…", भरल्या डोळ्यांनी हात जोडत वैष्णवीच्या वडिलांची विनंती, म्हणाले, "एखाद्या लेकराबाबत असं…"

Vaishnavi hagawane death case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं आहे. या प्रकरणाने आता न्यायालयाची पायरी चढली असून आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. दरम्यान, आरोपी हगवणेंच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेत बेधडक आरोप केले. एका अज्ञात व्यक्तीबरोबर तिचे चॅटिंग सुरु होते असा संशय हगवणेंना आला होता. यावरून वैष्णवी आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरु होता. त्यातूनच हा वाद झाला असून त्यातच तिने आत्महत्या केल्याचं हगवणेंच्या वकिलांनी म्हटलं. आता वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, माझी मुलगी तर गेली, आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, अशी कळकळीची विनंती वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडून केली.

वैष्णवीचे वडील माध्यमांबरोबर बोलताना म्हणाले की, “हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता. पण, हगवणेंना फॉर्च्यूनर देण्याअगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची एम जी हेक्टर पेटवून देईन, असं सांगण्यात आलं. हीच गाडी पाहिजे असा हट्ट केला होता म्हणून आम्ही फॉर्च्युनर दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं. आरोपीकडे पाच कोटींच्या गाड्या नाहीत, त्याच्याकडे एकच गाडी आहे तीही मी दिलेली”.

आणखी वाचा – भारती सिंहची तब्येत बिघडली, रक्त तपासणी करताना घाबरली अन्…; नेटकरी म्हणाले, “करोना तर…”

पुढे ते म्हणाले, “माझ्या मुलीची अगोदरच दोन लग्न मोडली होती, गाडी न दिल्यास लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे मी फॉर्च्युनर दिली. माझ्याकडे गाडी, चांदीच्या ताटाची मागणी, सोन्याची मागणी तसेच अधिक महिन्यात इतरही मागण्या करण्यात आल्या. माझ्या मुलीचे दोन लग्न मोडली त्याला हगवणे कुटुंब जबाबदार आहेत”, असेही वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी म्हटले.

आणखी वाचा – “मराठी बोलता, वाचता येत नाही…”, लोकप्रिय अभिनेत्याकडून टेलिव्हिजन विश्वातील सत्य परिस्थिती समोर, म्हणाला, ” उगाचच डोक्यावर…”

पुढे ते म्हणाले, “त्यांच्या वकिलांनी केलेल्या मुद्द्यावर मला असं बोलायचं आहे की, त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला कुठेतरी त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आहे, म्हणून ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. हे चॅट प्रकरण जे आता काढण्यात आले आहे त्याबद्दल आम्हाला पुसटशी माहितीही दिली नाही. माझी मुलगी तर आता गेलीय, वैष्णवीवर आता काहीही आरोप करुन शिंतोडे उडवू नका, अशी हात जोडून विनंती वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषदेतून केली. पत्रकार परिषदेत वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. तुम्हाला ही मुली असतील, तुम्ही सर्वांनी हा विचार करावा, तुम्हालाही मुली असतील, पण एखाद्या लेकराबाबत असं नका बोलू, अशी कळकळीची विनंती त्यांनी भरल्या डोळ्यांनी करत हात जोडले.

Tags: pune crime newssucide newsVaishnavi Hagawane death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Sudesh Mhashilkar Reacts Prachi Pisat

"अर्धवट माहिती देऊन…", प्राची पिसाटच्या गंभीर आरोपांवर सुदेश म्हशीलकरांनी सोडलं मौन, म्हणाले, "यामुळे माझं कुटुंब…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.