Anushka Sharma Fitness Secret : कलाकार मंडळी म्हटलं की ते स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जे त्यांच्या डाएटकडे विशेष लक्ष देतात. फिट राहण्यासाठी डाएटबरोबर ही कलाकार मंडळी व्यायामाकडेही अधिक लक्ष देतात. तर बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. सोशल मीडियावर ही मंडळी नेहमीच त्यांच्या डाएटचे, व्यायामाचे, फिटनेसचे अपडेट शेअर करत असतात. अशातच, आता बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या खास डाएटसाठी, तिच्या फिटनेससाठी नेमकं काय करते याबाबत आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. दोन मुलांना जन्म देऊनही अनुष्का आजही तितकीच फिट आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का चित्रपटांपासून दूर असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. ही अभिनेत्री आता दोन मुलांची आई आहे. तरीही, ती पूर्णपणे तंदुरुस्त दिसते. यासाठी अभिनेत्री कोणता आहार घेते हे आज आपण पाहणार आहोत. अनुष्का शर्मा ही शाकाहारी आहे हे फार कमी लोकांना माहित असेल. गेल्या अनेक वर्षांपासून, अभिनेत्रीने प्राण्यांपासून बनवलेले कोणतेही उत्पादन खाल्ले नाही. अनुष्काने तिच्या आहारात सोया मिल्क किंवा बदामाचे दूध समाविष्ट केले आहे. तसेच, ती नेहमी घरी बनवलेले अन्न खाते.
आणखी वाचा – बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…
अनुष्का गव्हाची भाकरी खात नाही. त्याऐवजी ती बाजरी, नाचणी वा बाजरीपासून बनवलेली रोटी खाते. चांगल्या त्वचेसाठी ती दिवसभरात ४ ते ५ लिटर पाणी पिते. तिच्या आहाराची काळजी घेण्याव्यतिरिक्त, अनुष्का शर्मा दररोज व्यायाम करते. कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि मेडिटेशन व्यतिरिक्त, ती दररोज योगा देखील करते.
विशेष म्हणजे, गरोदरपणात अभिनेत्रीने तिचे वेळापत्रक बदलले नाही, परंतु त्या दिवसांतही ती काही ना काही व्यायाम करत राहिली. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, अनुष्का शर्मा नृत्य आणि बॅडमिंटन खेळाद्वारे स्वतःला तंदुरुस्त ठेवते. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अनुष्का शर्मा शेवटची ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात त्याच्याबरोबर शाहरुख खान आणि कतरिना कैफ देखील होते.