Bigg Boss 19 : ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोचा जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. या रिऍलिटी शोबाबत जाणून घ्यायला चाहतेमंडळी नेहमीच उत्सुक असतात. या शोमधूला एखाद्या स्पर्धकाचे आयुष्य चमकते तर एखाद्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आजवर अभिनेता सलमान खान याने सांभाळली आहे. ‘बिग बॉस’ १८ संपून आता बरेच दिवस झाले आहेत, त्यामुळे या शोच्या आगामी सिझनची चाहत्यावर्गात उत्सुकता लागून राहिलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १९’ केव्हा येणार याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच हा शो सुरु असलेल्या चॅनेलबाबत मध्यंतरी कुजबुज कानावर आली.
बनिजय एशिया (एंडेमोल शाइन इंडिया) हे निर्मिती करणार प्रॉडक्शन हाऊस कलर्स टीव्हीपासून वेगळं होणार आहे. हे प्रॉडक्शन हाऊस बर्याच वर्षांपासून बिग बॉसचे घर आहे. या बातमीने ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या दोन्ही शोच्या प्रेक्षकांना भरपूर वाट पाहायला लावली. पण आता एक चांगली बातमी समोर आली आहे. पिंकविलाने या शोबाबतचा मोठा खुलासा केला आहे. ‘बिग बॉस १९’ लवकरच सुरु होणार आहे आणि याची निर्मिती ‘एंडेमोल शाईन इंडिया’द्वारे केली जाईल. हा शो प्रेक्षकांना पाहायला आवडणारी सर्व नाटक, आव्हाने आणि करमणूक आणण्याचे वचन देतो.
सूत्रसंचालकच्या भूमिकेत कोण दिसणार?
त्याहूनही अधिक रोमांचक म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सूत्रसंचालक म्हणून यंदाच्या ‘बिग बॉस १९’ची बाजू सांभाळणार आहेत. बर्याचदा ऐकायला मिळाले आहे की, सलमान खान हा शो सोडत आहे. परंतु त्याचे व्यस्त वेळापत्रक असूनही, ५९ वर्षीय भाईजान प्रेक्षकांच्या प्रेमापोटी हा शो पुन्हा एकदा होस्ट करण्यास तयार झाला आहे.
आणखी वाचा – करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचीच हवा, हळदीच्या ड्रेसपुढे नवरीही फिकी
जूनमध्ये प्रोमो, जुलैमध्ये प्रीमियर
‘बिग बॉस १९’ चा पहिला प्रोमो जूनच्या अखेरीस शूट केला जाईल. नवीन हंगामाचा प्रीमियर जुलैच्या उत्तरार्धात असणे अपेक्षित आहे. सलमान खानचा बिग बॉसशी सखोल संबंध आहे आणि जेव्हा तो शोचे आयोजन १९ व्या वेळा करणार आहे.