Actor Decision Donate His Organs : अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकतं, थांबलेलं जगणं सुरु होऊ शकतं या सुविचाराने अनेकजण हा मोठा निर्णय घेतात. हो. मात्र असा विचार करणारे तुरळकच लोक असतील. ज्यांना इतरांच्या आयुष्याचे सोने करुन स्वर्गवासी व्हायचे असते. आपल्या अस्तित्वाने अनेकांच्या आयुष्यात फरक पडतो. पण आपलं अस्तित्व कायम असणं, कुणाला तरी त्याचा सकारात्मक फरक पडणं, आपल्यानंतर आपल्या शरिराचा कुणाला तरी उपयोग होणं हे समाधान काही औरच. हा निर्णय घेणे इतके सोप्पे नाही. अर्थात यासाठी मनाची पूर्णतः तयारी असणे आवश्यक आहे. आणि हीच मनाची तयारी केलीय एका मराठमोळ्या अभिनेत्याने आणि त्याच्या पत्नीने. बायकोच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या मराठमोळ्या अभिनेत्याने याबाबतची अधिकृत बातमी दिली.
अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे मराठमोळा अभिनेता अंकुर वाढवे आणि त्याची पत्नी निकिता खडसे हिने. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अंकुरने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. पत्नी निकिता हिच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अभिनेत्याने त्याच्या पत्नीसह अवयवदान आणि देहदान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील जे. जे. रुग्णालय बाहेरुन फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आणखी वाचा – परेश रावल यांच्याकडून अधिक मानधनाची मागणी?, ‘हेरा फेरी 3’ सोडण्यामागचे नेमके कारण काय?, सत्य समोर
या पोस्टमध्ये अंकुरने असं म्हटलं आहे की, “निमित्त बायकोच्या वाढदिवसाचं. आम्ही दोघांनीही आज जे. जे. हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर अवयवदान आणि देहदान करण्याचा संकल्प केला आहे. बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि या आमच्या इच्छेला पूर्णरुप देण्यासाठी डॉ. रेवत कानिंदे यांचे आभार”, असं त्याने म्हटलं आहे. अंकुरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – कॅन्सरमुळे हिना खानची झालीय अशी अवस्था, चेहरा पाहून चाहतेही हैराण, सतत त्रास, वेदना अन्…
सोशल मीडियावर अंकुरची ही पोस्ट पाहून अनेकजण त्याच्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत. त्याच्या या पोस्टवर कमेंटद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे. अंकुरने ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कायक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. २८ जून २०१९ रोजी अंकुर आणि निकिता यांचा शुभविवाह सोहळा पार पडला. थेट लग्नाचे खास फोटो शेअर करत त्याने याबाबतची माहिती चाहत्यांना देत सुखद धक्का दिला.