virat kohli and rahul vaidya fight : बरेच दिवसांपासून राहुल वैद्य आणि विराट कोहली हा वाद वाढत असल्याचं पाहायला मिळालं. विराट कोहलीच्या कुटुंबीयांनी शेवटी गायक राहुल वैद्य आणि विराट कोहलीच्या चाहत्यांमधील वाढत्या ऑनलाइन वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यावेळी राहुल वैद्यने क्रिकेटपटूला जोकर म्हणण्यास सुरवात केली. कोहलीने अवनीत कौरच्या फोटोला लाईक केल्याच्या चर्चांना ‘इंस्टाग्राम अल्गोरिदम विघटन’ असल्याचं स्पष्टीकरण दिलं. नंतर राहुल वैद्यने अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये विराट कोहलीच्या या स्पष्टीकरणाची चेष्टा केली आणि काही वर्षांपूर्वी कोहलीने त्याला ब्लॉक केले असल्याचे म्हटले.
आता विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली राहुलवर टीका करण्यासाठी पुढे आला आहे. थेट पोस्ट शेअर करत त्याने टीका करणाऱ्या राहुल वैद्यला खडसावले आहे, “जर इतकी मेहनत तुझ्या गायकीवर घेतली तर या मेहनतीच्या जोरावर तू पुढे जाशील”. संपूर्ण देश सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष देत आहेत की काय चालले आहे. हा मूर्ख विराटच्या नावावर फॉलोवर्स वाढवण्याचा आणि चर्चेत येण्याचा प्रयत्न करत आहे. हे किती असफल असण्याचं चित्र आहे”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

राहुलने आगीत तेल ओतत इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत म्हटलं की, “तर मित्रांनो, विराट कोहलीने मला ब्लॉक केले आहे. जसे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की, मला वाटते की हा देखील एक इन्स्टाग्रामवरील गोंधळ आहे. इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमने विराट कोहलीला सांगितले असावे, “मी तुझ्या वतीनं राहुल वैद्यला ब्लॉक करतो”.
या चर्चांदरम्यान एक नवीन ट्विस्ट आला जेव्हा अलीकडेच एक थ्रोबॅक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये राहुल विराटची पत्नी अनुष्का शर्मासाठी एका कार्यक्रमात स्टेजवर गाणे गाताना दिसला. गायक तिच्यासाठी गाणे गात असताना अनुष्काचा हातात हात घेत किस करतानाही दिसला. यावर अनेक मिम्स व्हायरल झाले. चाहत्यांनी विनोदपूर्वक अंदाज लावला की, हा जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर कोहलीने राहुलला ब्लॉक केले असावे, अशी चर्चा आहे.