Akshay Kelkar Haldi Ceremony : यंदाच्या मराठी सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी एकामागोमाग एक लग्नबंधनात अडकत आहेत. अनेक कलाकारांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अशातच काही दिवसांपासून एका मराठमोळ्या अभिनेत्याची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळाली. हा अभिनेता म्हणजे ‘बिग बॉस’ विजेता अक्षय केळकर. बरेच दिवसांपासून अक्षयच्या लग्नाची जोरदार सुरुवात असलेली पाहायला मिळाली. तो त्याच्या लग्नापुर्वीच्या तयारीचे अपडेट सोशल मीडियावर चाहत्यांना देताना दिसत आहे. अक्षय गायिका साधना काकटकरसह विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून साधना आणि अक्षय यांचे प्रेमाचे नाते होते. आता त्यांच्या या प्रेमाचं रूपांतर लग्नात होणार आहे. आता अक्षय व साधना यांच्या लग्नविधींनाही सुरुवात झाली आहे.
अक्षय व साधना यांचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला. यापाठोपाठ अभिनेत्याच्या हळदी समारंभही थाटामाटात संपन्न झाला असल्याचं समोर आलं. अक्षयच्या हळदी समारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये नवऱ्या मुलाला हळद लागली असल्याचं पाहायला मिळालं. कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या आणि कलाकार मंडळींच्या उपस्थितीत अक्षयचा हळदी कार्यक्रम पार पडला. अक्षयच्या हळदीला कलाविश्वातील समृद्धी केळकर आणि प्रथमेश परब या कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली.
अक्षय व साधना या दोघांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लग्नासाठी त्यांनी खास #रमाक्षय हा हॅशटॅगही तयार केला आहे. अक्षय व साधना यांच्या मेहंदी सोहळ्याचीही बरीच चर्चा रंगली. कारण अक्षयच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या मेहंदीमध्ये एका हातावर विठोबा आणि दुसऱ्या हातावर रुक्मिणी यांचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या मेहंदीने लक्ष वेधलं. तर अक्षयने #रमाक्षय असं त्याच्या मेहंदीने हातावर लिहिलं.
आणखी वाचा – “आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…
अक्षयने काही दिवसांपूर्वीच त्याच्या बायकोसह लग्नाच्या शॉपिंगला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच अक्षय लग्नपत्रिका घेऊन त्याच्या आईसह त्याच्या गावी दापोलीला कुलदेवतेच्या दर्शनाला गेले होते. आता अखेर लवकरच अक्षय बोहोल्यावर चढणार आहे. अक्षय व साधना यांच्या लग्नसोहळ्याची सध्या उत्सुकता लागून राहिली आहे.