रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या ‘त्या’ दोन महिला कोण?, कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंहची चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 7, 2025 | 3:29 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
operation sindoor details

‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या ‘त्या’ दोन महिला कोण?

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात निष्पाप २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. निसर्गाचा आनंद घ्यायला गेलेल्या पर्यटकांना धर्म विचारुन दहशतवाद्यांनी मारलं. या हल्ल्यालाच प्रत्युत्तर म्हणून ६ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर (operation sindoor) अंतर्गत भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारतीय लष्कराने रात्री १ वाजून ५ मिनिटांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १ वाजून ३० मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर मोहिम भारतीय लष्कराने पूर्ण केली. फक्त २५ मिनिटांमध्ये भारताने पाकिस्तानला योग्य ते उत्तर दिलं. मात्र यामध्ये एक कौतुकास्पद गोष्ट भारताने केली. हल्ल्यामध्ये पाकिस्तानी रहिवाशी तसेच पाकिस्तानी लष्कराला कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती दोन कर्तृत्ववान महिलांनी दिली. त्या दोन महिला कोण? हे आपण जाणून घेऊया. (operation sindoor details)

आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी (Col. Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Wing Commander Vyomika Singh) यांनी पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबाबत संपूर्ण माहिती दिली. कुठे, कधी आणि कशी ही कारवाई करण्यात आली याबाबत या दोन महिलांनी सविस्तर सांगितलं. यामुळे संपूर्ण देशाला ऑपरेशन सिंदूरची योग्य ती माहिती मिळाली. पण सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह नक्की कोण? याविषयी सविस्तर बोलुयात…

आणखी वाचा – पहलगाम हल्ल्यात आपला माणूस गमावलेल्या ‘ती’चा आवाज, Operation Sindoor नंतर डोळ्यांत पाणी

कर्नल सोफिया कुरेशी कोण?

सोफिया कुरेशी यांचा जन्म १९८१मध्ये गुजरातमध्ये झाला. गुजरातमधील वडोदरा येथे त्यांचं बालपण गेलं. बायोकेमिस्ट्रीमध्ये त्यांनी पदवी घेतली. काही रिपोर्ट्सनुसार सोफिया यांचे आजोबाही सैन्यात होते. शिवाय त्यांच्या वडिलांनीही सैन्यात काम केलं आहे. १९९९मध्ये भारतीय सैन्यामध्ये त्या दाखल झाल्या. भारतीय वायुसेनेमध्ये त्या हेलिकॉप्टर पायलट आहेत. भारतीय लष्कराच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांनी बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारतीय तुकडीचे नेतृत्व केले. भारतीय तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील सोफिया या पहिल्या महिला अधिकारी होत्या.

आणखी वाचा – भारताकडून पाकिस्तानला करारा जवाब, मोहिमेला Operation Sindoor हे नाव का दिलं?, वाचा सविस्तर

विंग कमांडर व्योमिका सिंग कोण?

विंग कमांडर व्योमिका सिंग यांची हवाई दलातील कामगिरी उल्लेखनीय आहे. १८ डिसेंबर २००४ मध्ये भारतीय हवाई दलामध्ये त्यांची नियुक्ती झाली. आज टॉपच्या विंग कमांडरपैकी व्योमिका सिंग यांचं नाव आदराने घेतलं जातं. लढाऊ हेलिकॉप्टर हाताळण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. जम्मू आणि काश्मीरसारख्या भागात चिता व चेतक यांसारखी हेलिकॉप्टर हाताळही आहेत. २०२०च्या नोव्हेंबरमध्ये अरुणाचल प्रदेशातील मोहिमेचे त्यांनी नेतृत्त्व केले होते.

Tags: trending newstrending video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
Pawandeep rajan accident health update

अपघातानंतर पनवदीपवर सहा तास शस्त्रक्रिया, शुद्धीत आल्यानंतर पहिला फोटो समोर, आता परिस्थिती अशी की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.