बरेच कलाकार असे असतात जे कित्येकदा त्यांच्या भूमिकेमुळे ट्रोलिंगला सामोरे जातात. बरेच असे कलाकार आहेत जे नेटकऱ्यांच्या प्रश्नांना सामोरे जाताना दिसतात, त्यांना सडेतोड उत्तर देत असतात. मात्र काही कलाकार असे आहेत जे नेटकऱ्यांच्या टीकेला कधीच प्रतिउत्तर देत नाही, वा त्यांच्याकडून कोणत्याच कौतुकाची अपेक्षाही ठेवत नाहीत. त्यांना मुख्यत्वे आपला अभिनय प्रिय असतो. यांत एक नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री रसिका सुनील. (Rasika Sunil Statement)
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून खलनायिका भूमिका साकारत रसिकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र वैयक्तिक कारणामुळे तिने ही मालिका अर्ध्यावरच सोडली. मालिका अर्ध्यावरूनच सोडल्यामुळे तिला बरच ट्रोल करण्यात आलं होत. बरं याशिवाय रसिक नेटकऱ्यांच्या तावडीत सापडली ती म्हणजे तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे. रसिका तिच्या बोल्ड भूमिकांमुळे ट्रोल होताना दिसली.
पाहा बोल्ड आणि किसिंग सीन बद्दल काय म्हणाली रसिका (Rasika Sunil Statement)
तिचे चित्रपटातील किसिंग सीन किंवा बिकीनी लूक खूप व्हायरल झाले होते. यावर भाष्य करत रसिका म्हणाली की, “मी विचारांनी जास्त बोल्ड आहे असं म्हणेन. एरवी कोणाचा आयुष्य व घडामोडींबाबत माझं काहीही म्हणणं नसतं कारण जिथे पूर्वग्रह येतो तिथे आपण संकूचित होतो. कपड्यांबाबत बोल्डनेस हा समोरच्याच्या नजरेवर अवलंबून असतो कपड्यांनी बोल्ड असणं हा मुद्दाच मला पटत नाही.”

यापुढे बोलताना ती म्हणाली आहे की, “सोशल मीडियावर अनेकदा नकारात्मक कमेंट्स येत असतात पण त्या पासून दूर राहण्यासाठी मी आता त्या वाचणचं बंद केलं आहे. मला तुमचं कौतुकही नको आणि टीकाही नको.. आयुष्यात आपल्या सभोवती असणाऱ्या लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या मी नकारात्मक ते कडे लक्ष देत नाही.”
सध्या रसिकाचं ‘डाएट लग्न’ हे नाटक सुरु आहे.