Manglashtaka returns Movie Poster : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकामागोमाग एक प्रेमकथेवर भाष्य करणारे चित्रपट येत आहेत. रोमँटिक आणि आशयघन अशा चित्रपटांची सध्या रांगच लागली आहे. आता तर प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषयमाहे असं म्हणणंही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे अनेक प्रेमकहाण्या आजवर पडद्यावर आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनोखी टॅगलाइन असलेला आणि एका वेगळ्याच कथेला प्रेक्षकांसमोर घेऊन येणार ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा नवा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात लग्न नव्हे तर घटस्फोट सोहळ्याची जंगी तयारी पाहायला मिळत आहे.
याआधी घटस्फोट सोहळ्याचे एक अनोखे टीजर पोस्टर सोशल मीडियावार चांगलेच चर्चेत आले होते. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं पाहायला मिळालं. ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’च्या वीर कुमार शहा यांनी निर्मिती केलेल्या ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केलं आहे. डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीत दिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.
आणखी वाचा – “बिकिनी घाल असं ते मला बोलले अन्…”, नयना आपटेंनी सांगितला ‘तो’ अनुभव, म्हणाल्या, “काम मिळवण्यासाठी…”
या चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरराव ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पौलस्ते या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकाही आहेत. राजकीय विरोधाची पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबातील तरुण-तरुणी एकाच कॉलेजमध्ये एकत्र येतात. मात्र, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडत जातात याची रंजक कहाणी ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – प्रेम, वेदना आणि…; ‘माझी प्रारतना’चा जबरदस्त ट्रेलर समोर, उपेंद्र लिमयेंच्या भूमिकेची कमाल
सुलट प्रेमाची उलट गोष्ट या टॅगलाइनमुळे या गोष्टीत अनेक ट्विस्ट असणार आहेत याचा नक्कीच अंदाज बांधता येत आहे. त्यामुळेच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या पोस्टरचा लुकही अगदी फ्रेश आहे. त्यामुळे ही गोष्ट अनुभवण्यासाठी २३ मेपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.