Mazi Prartana Movie Trailer : मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन आणि आशयघन असे विषय प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. विशेषतः मराठी चित्रपटांमधून दाखवण्यात येणाऱ्या प्रेमकथा या अधिक लक्षवेधी ठरतात. अशातच एक नवीन आणि हृदयस्पर्शी प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बरेच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सिनेविश्वात सुरु असलेली पाहायला मिळत होती. अखेर आता या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वत्र धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित ‘माझी प्रारतना’ हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे आणि आज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर जगण्याची एक जाणीव आहे आणि ही जाणीव सादर करणारा हा उत्कृष्ट ट्रेलर आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकता की प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत टिकतं, तेव्हाच त्याची खरी ताकद समोर येते. अशाच प्रेमाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा हा ट्रेलर आहे ज्यात सुदंर चित्रीकरण,उत्कृष्ट अभिनय, मधुर संगीत आणि इमोशन्स आपण पाहू शकतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर कथेबाबतची उत्कंठा आणखीनच वाढली आहे. कथेमधील रहस्य आणि कहाणी नक्की कशी असणार आहे हे येत्या ९ मे ला समजेलच.
आणखी वाचा – शिवाजी साटम यांची CID मधून एक्झिट झाल्यनंतर नवा एसीपी ट्रोल, पार्थ समथान म्हणाला, “त्यांची जागा घेण्याइतपत…”
‘माझी प्रारतना’ हा चित्रपट ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ही एक संगीतप्रधान कथा असून, प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप प्रमुख भूमिकेत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकारही यात सहभागी आहेत.
आणखी वाचा – आधारकार्डवरील नाव, वय, जन्मतारीख व पत्ता तुम्ही किती वेळा बदलू शकता?, याची माहिती नसेल तर…
‘एस आर एम फिल्म स्कूल’ प्रस्तुत ‘माझी प्रारतना’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केलं आहे. पद्माराज नायर फिल्म्स यांची निर्मिती असून संगीत विश्वजित सी.टी. यांनी दिले आहे. ‘माझी प्रारतना’ हा सिनेमा ९ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.