Sayaji Shinde Video : सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे नेहमीच त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त विविध कार्यांमध्ये प्रगल्भ असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी सामाजिक कार्यांमध्ये पुढाकार घेताना दिसतात. मग ते कधी कोणा व्यक्तीच्या मदतीसाठी असो, वा कोणा व्यक्तीच्या आजारपणात घेतलेली धाव असो किंवा वृक्षलागवड, प्राणीप्रेमी यांसारखे सामाजिक विषय असो. ही कलाकार मंडळी नेहमीच या सामाजिक कार्यांमध्ये वा मदतीसाठी तत्पर दिसतात, आणि या यादीत एक अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे अभिनेते सयाजी शिंदे. सयाजी शिंदे अभिनयासह वृक्षारोपण प्रक्रियेत विशेष सक्रिय आहेत.
हिंदी, मराठी आणि साऊथ सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने घराघरांत पोहोचलेले अष्टपैलू अभिनेते म्हणून सयाजी शिंदे यांना ओळखले जाते. सयाजी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाची जबाबदारी पेलताना दिसत आहेत. एक उत्तम अभिनेते असण्याबरोबरच ते पर्यावरणप्रेमीही आहेत. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडियाद्वारे प्रत्येकाला वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन करताना दिसतात. त्यांची वृक्षारोपणाची आवड त्यांना कधीही शांत बसू देत नाही.
सोशल मीडियावरही त्यांच्या समाजकार्याचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. बरेचदा ते शेतात राबताना वा काम करताना दिसतात. अशातच सयाजी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन “आनंदाचे सोबती आमचे आबा”, असं कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सयाजी शेतात आबांसह ठेका धरताना दिसत आहेत. त्यांचा हा आनंदाने शेतात थिरकतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीसही पडला असून कमेंटचा वर्षाव यावर होताना दिसतोय.
आणखी वाचा – “कुत्रे लोक भुंकणारच”, गोविंदाच्या पत्नीचं वादग्रस्त विधान, म्हणाली, “आमच्या नात्याबद्दल…”
“या माणसाचे पूर्ण बॉडी चेकअप जरी केले तरी गर्व नावाचा वायरस यांच्या अंगात कुठेच भेटणार नाही. मस्त साहेब”, “सर्वोच्च उंचीचा माणूस असून सुद्धा किती जमीनीवर आहे, हे फक्त एकच ज्वलंत उदाहरण आहे”, “काय खतरनाक रसायन आहे. तीन इंडस्ट्री आणि रंगमंच गाजवूनही इतका जमिनीशी जोडलेला माणूस. खऱ्या अर्थाने नटरंग”, “जमिनीवर पाय ठेवून आभाळाला गवसणी घालणारा अभिनेता”, अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी सयाजी यांचं भरभरुन कौतुक केलं आहे.