Ankita Walawalkar Wedding : सध्या कलाक्षेत्रात लगीनघाई सुरु आहे. मालिकांमध्ये काम करणाऱ्या काही कलाकारांचं नव्या वर्षात अगदी थाटामाटात लग्न झालं. तर काही कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच आता आणखी एका विवाहसोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. कोकण हार्टेट गर्ल अंकिता वालावलकरच्या लग्नाची सध्या सगळीकडेच क्रेझ आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्येच अंकिताने तिच्या लग्नाबाबत तसेच होणाऱ्या नवऱ्याविषयी भाष्य केलं होतं. आता खऱ्या अर्थाने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात होत आहे. अंकिता व कुणाल भगतच्या लग्नापूर्वीच्या विधींचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता दोघांचं लग्नही थाटामाटात पार पडलं आहे.
अंकिताने कोकणात देवबागमधील तिच्या घरीच लग्न व लग्नापूर्वीचे विधी थाटामाटात करण्याचे ठरवलं. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्येच या अंकिता-कुणालचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. अंकिताच्या पारंपरिक लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचबरोबरीने तिने परिधान केलेल्या पारंपरिक दागिन्यांनी सगळ्यांनाच भूरळ घातली आहे. तसेच कुणालचा लग्नातील लूकही कौतुकास्पद आणि लक्षवेधी आहे. अंकिता-कुणालच्या लग्नात कुटुंबिय तर अगदी धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. तसेच मित्र परिवाराने कमालीचा दंगा घातला.
आणखी वाचा – ‘छावा’साठी प्रेक्षक वेडे, एका दिवसातच कमावले तब्बल इतके कोटी, विकी कौशलचा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करणार
कोकणातील घरात लग्न व्हावं अशी बहुदा अंकिताची इच्छा होती. म्हणूनच की काय तिने तिच्या स्वप्नातील लग्न हवं तसं सुंदर पद्धतीने प्लॅन केलं. अंगणातील मंडपापासून ते स्वतःच्या लग्नातील ड्रेसपर्यंत तयारी करण्याची धडपड अंकिताने तिच्या नवऱ्याच्या मदतीने केली. प्रत्येक गोष्टीमध्ये कुटुंबियांची साथ मिळालीच पण तिने स्वतःने लग्नाचा डामडौल उभा कला. याचंही विषेश कौतुक सोशल मीडियावर होताना दिसलं. आता दोघांच्या सुखी संसारासाठी कलाक्षेत्रातीलही सगळीच मंडळी शुभेच्छा देत आहेत.
आणखी वाचा – प्रतीक बब्बर दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात, पत्नीसह शेअर केलेल्या फोटोंनी वेधलं लक्ष, अभिनेता भावुक
अंकिता-कुणालच्या लग्नाला कलाक्षेत्रातील मंडळींसह अनेक कंटेन्ट क्रिएटरनेही हजेरी लावली होती. तिचा साखरपुडा, हळद, संगीत सोहळाही चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबरीने अंकिताने दोन्ही कुटुंब एकत्र यावेत, एकमेकांशी त्यांची ओळख व्हावी म्हणून अनोखी शक्कल लढवली. तिने लग्नापूर्वी काही गेम डिझाइन केले होते. त्यानुसार दोन्ही कुटुंबियांतील मंडळींनी धमाल केली. शिवाय अंकिता व कुणालच्या नावाने वेगवेगळ्या क्रिकेट टीमही होत्या. यावेळी समुद्रकिनारी धमाल क्रिकेट सामनेही झाले. फक्त लग्न हे स्वतःपुरताच न ठेवता अंकिता-कुणालने मित्र परिवारासह कुटुंबाला एकत्रित आणण्याचा केलेला प्रयत्न खऱंच कौतुकास्पद होता.