दाक्षिणात्य अभिनेत्री अपर्णा विनोद पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री अपर्णा विनोदने तिचा पती रिनिलराज पीकेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडियावर याची घोषणा केली असून लग्नाला ‘कठीण टप्पा’ असं म्हटलं आहे. तसंच अभिनेत्रीने खुलासा केला की, हा तिच्यासाठी ‘भावनिकदृष्ट्या थकवणारा’ अनुभव होता. असिफ अली आणि इंद्रजित सुकुमारन स्टारर मल्याळम चित्रपट ‘कोहिनूर’ आणि थलपथी विजयच्या ‘बैरवा’ चित्रपटामधून अपर्णाने लोकप्रियता मिळवली होती. अशातच तिच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना दु:ख झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिननेत्रीने तिच्या विभक्त होण्याची बातमी सांगितली आहे. (Aparna Vinod separate from Rinil raj PK)
इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर करताना अपर्णा विनोदने लिहिले की, “प्रिय मित्र आणि फॉलोअर्स, मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहे की, अलीकडे माझ्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल झाला आहे. खूप विचार करून मी माझे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता, परंतु मला विश्वास आहे की, पुढे जाणे हा माझ्यासाठी योग्य निर्णय आहे. माझे लग्न हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि भावनिक थकवणारा टप्पा होता. त्यामुळे पुढे जाण्यासाठी मी तो अध्याय बंद केला आहे”
यापुढे अभिनेत्री पुढे म्हणाली की, “या काळात मला मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे”. ऑक्टोबर २०२२ मध्ये लग्न झाल्यानंतर अपर्णा आणि रिनिलराज पीके यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका खाजगी विवाह सोहळ्यात त्यांनी लग्न केले. अपर्णाने कोडकारा येथील महाविद्यालयातून मानसशास्त्रात बी.एस.सी. पदवी मिळवली आणि नंतर चेन्नईतील महाविद्यालयातून त्याच क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणही घेतलं.
आणखी वाचा – थायलंडमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे आगीशी खेळ, व्हिडीओ पाहून नेटकरीही भटकले, म्हणाले, “मृत्यूशी खेळ का?”
दरम्यान, अपर्णा विनोदच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, दिग्दर्शक प्रियानंदनच्या ‘नजान निन्नोडू कूदेयंडू’ (२०१५) मधून पदार्पण केल्यानंतर, अपर्णा ‘कोहिनूर’ आणि ‘बैरवा’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. ती शेवटची दिग्दर्शक शरण कुमारच्या ॲक्शन थ्रिलर ‘नाडुवन’ मध्ये दिसली होती.