Home टी व्ही Zee Marathi वर रविवारी रंगणार मनोरंजनाची मेजवानी

Zee Marathi वर रविवारी रंगणार मनोरंजनाची मेजवानी

0
SHARE
Zee Marathi वर रविवारी रंगणार मनोरंजनाची मेजवानी

प्रेक्षकांचं मनोरंजन हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून Zee Marathi या वहिनीने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. येत्या रविवारी म्हणजेच ६ जानेवारीला Zee Marathi प्रेक्षकांसाठी लागीरं झालं जी, तुझ्यात जीव रंगला आणि माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकांचे १ तासांचे विशेष भाग सादर करणार आहे.

लागीरं झालं जी मालिकेत शीतल मामींना हाताशी घेऊन हर्षवर्धन आणि जयश्री यांना त्यांच्या घरी रवाना करायच्या प्रयत्नात आहे आणि काही प्रमाणात ती यशस्वी देखील होत आहे पण हर्षवर्धनला शीतलच्या पुढील चालीची चाहूल लागताच तो काय करेल? या खेळात कोण कोणावर मात करणार हे प्रेक्षकांना रविवारी संध्याकाळी ७ वाजता पाहता येईल. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राणा आणि अंजली जरी विरोधक म्हणून आमने सामने असले तरीही दोघांमधलं प्रेम खुलतंय. अंजली राणाला तिच्यासोबत पुन्हा एकदा लग्न करण्याची मागणी करते. आता राणा नक्की काय करणार हे रविवारी रात्री ८ वाजता प्रसारित होणाऱ्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सुलक्षणा बाईंच्या एन्ट्रीमुळे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने एक वेगळेच वळण घेतले आहे. राधिकाचे ३०० करोड बळकवायचा एकच उद्देश सुलक्षणाच्या मनात आहे. दुसरीकडे गुरुनाथला शनायासोबत लग्न करायचं आहे पण त्याच्याकडे सध्या पैसे नसल्यामुळे सुलक्षणा शनाया आणि गुरुनाथला एकमेकांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण गुरुनाथ शनायासोबत पळून जाऊन लग्न करणार आहे. त्यांचं लग्न पार पडणार? राधिका लग्नाचा डाव कसा उलटणार? याचं उत्तर प्रेक्षकांना रविवारी रात्री ९ वाजता मिळेल.

मनोरंजनाची ही धमाल मेजवानी प्रेक्षक येत्या रविवारी ६ जानेवारीला अनुभवू शकतात. तेव्हा पाहायला विसरू नका लागीरं झालं जी संध्याकाळी ७ वाजता, तुझ्यात जीव रंगला रात्री ८ वाजता आणि माझ्या नवऱ्याची बायको रात्री ९ वाजता फक्त Zee Marathi वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here