"त्यावेळी आत्महत्येचा विचार मनात आला पण..." : कपिल शर्मा

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा कार्यक्रम सध्या खूप लोकप्रिय आहे

यामुळे कपिल शर्मा अधिक प्रकाशझोतात आला आहे

मात्र एक असा काळ होता जेव्हा कपिलने स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार केला होता

कपिलचा ‘किस किस को प्यार करु?’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता

त्याचवेळी त्याचे सुनील ग्रोव्हर बरोबर भांडणदेखील झाले होते

अशा सर्व घटना एकत्रित झाल्यामुळे त्याच्यावर खूप आघात झाला होता

यावेळी त्याने एका मुलाखतीदरम्यान भाष्य केले होते

तो म्हणाला की, “मी एकटा पडलो होतो. घरातून बाहेर जाऊ शकत नव्हतो”

पुढे तो म्हणाला की, “मला एकट्याला घर खायला उठायचं आणि त्याचवेळी मी दोन वेळा आत्महत्या करण्याचाही विचार केला”

मात्र सध्या त्याची आर्थिक व मानसिक स्थिती चांगली असून त्याचा शो खूप प्रसिद्ध आहे