‘ॲनिमल’ चित्रपटातील 'जमाल कुडू' या गाण्याच्या स्टेप बॉबी देओल कुठे शिकला? 

‘ॲनिमल’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहे

यामध्ये बॉबी देओलची भूमिका अधिक लक्षवेधी ठरली आहे

बॉबीची या चित्रपटात अबरार ही भूमिका होती

यामध्ये बॉबीच्या एंट्रीचा डान्स सगळ्यांनाच आठवतो

‘जमाल कुडू’ या गाण्यावर त्याने केलेल्या स्टेप सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाल्या

या स्टेप तो नक्की कुठे शिकला? असा प्रश्नदेखील त्याला विचारला

त्याने सांगितले की, “पंजाबमधील घरी पार्टी करताना अनेकदा वडील किंवा आम्ही मित्र ग्लास डोक्यावर घेऊन नाचायचो”

चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शकाला काहीतरी हटके हवे होते तेव्हा मी सहज असं नाचून दाखवलं

नंतर हे पुढे चित्रपटात तसेच ठेवण्यात आले